World Table Tennis Star Contender 2023: महिला एकेरीतील भारताची अव्वल महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिने गुरुवारी रात्री धडाकेबाज विजय नोंदवत वर्ल्ड टेबल टेनिस (डब्ल्यूटीटी) स्टार कंटेंडर स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानी असलेल्या प्युएट्रो रिकोच्या २२ वर्षीय ॲड्रियाना दियाझ हिला मनिकाने ३-१ (११-९, ११-८, ५-११, ११-८) असे पराजित केले. तुलनेत २७ वर्षीय मनिका जागतिक क्रमवारीत ३४व्या स्थानी आहे.
रंगतदार लढतीत मनिकाने २-० अशी आघाडी प्राप्त केली, मात्र ॲड्रियाना हिने तिसऱ्या गेममध्ये मुसंडी मारली. ३-३ अशा बरोबरीनंतर तिने मनिकाला मागे टाकत गेम जिंकला. चौथ्या गेममध्ये मनिकाने जबरदस्त खेळ केला. ती २-५ अशी पिछाडी पडली होती.
गतवर्षी आशिया कप टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीत ब्राँझपदक जिंकलेल्या मनिकाने नंतर सलग सात गुण प्राप्त करत ॲड्रियानाला ९-५ असे मागे टाकले व नंतर गेम जिंकून उपउपांत्यपूर्व फेरीतील जागा पक्की केली.
पुढील फेरीत आता मनिकासमोर जागतिक क्रमवारीत विसाव्या स्थानी असलेल्या चीनच्या डावखुऱ्या कियान तियान्यी हिचे आव्हान असेल. उपउपांत्यपूर्व फेरीत आता मनिका व सुतिर्था मुखर्जी यांच्यावर भारताच्या आशा असतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.