Mumbai City FC : मुंबई सिटीकडून फुटबॉलपटू मंदार करारमुक्त

माजी विजेत्यांतर्फे लेफ्ट बॅक खेळाडूची तीन वर्षीय कारकीर्द
Mandar Rao Dessai
Mandar Rao Dessai Dainik Gomantak
Published on
Updated on

Mandar Rao Dessai : गोमंतकीय लेफ्ट बॅक फुटबॉलपटू मंदार राव देसाई याला तीन वर्षांच्या सफल कारकिर्दीनंतर मुंबई सिटी एफसीने करारमुक्त केले. त्याचा करार या महिनाअखेरीस अधिकृतपणे संपेल.

एफसी गोवातर्फे इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेत खेळल्यानंतर 31 वर्षीय मंदार ऑक्टोबर 2020 मध्ये मुंबई सिटी एफसी संघात दाखल झाला होता. त्यानंतर त्याने मुंबई सिटीच्या यशस्वी वाटचालीत मोलाचा वाटा उचलला.

Mandar Rao Dessai
Revolutionary Goans : आरजी लढवणार लोकसभेच्या दोन्हीही जागा; मनोज परब यांची माहिती

2020-21मोसमात मंदार संघात असताना मुंबई सिटीने आयएसएल लीग विनर्स शिल्ड आणि आयएसएल करंडक जिंकून शानदार ‘डबल’ साधले. नंतरच्या मोसमात तो संघाचा उपकर्णधार बनला. 2022 मधील एएफसी चँपियन्स लीग मोहिमेत मंदार मुंबई सिटीचा प्रमुख शिलेदार होता. त्या स्पर्धेच्या ‘ब’ गटात मुंबई सिटीने दोन सामने जिंकले, तर एक बरोबरी नोंदविली.

मुंबई सिटीने २०२२-२३ मोसमात सलग 18 सामने अपराजित राहत दुसऱ्यां लीग विनर्स शिल्डचा मान मिळविला. या कामगिरीतही मंदार झळकला. एकंदरीत तीन मोसमात मंदारने मुंबई सिटीने 52 सामने प्रतिनिधित्व केले.

Mandar Rao Dessai
Girish Chodankar : काँग्रेस नेते गिरीष चोडणकरांची सभापतींवर टिका; संजय राउतांची घेतली भेट

ओडिशा एफसीकडून चार खेळाडूंना निरोप

ओडिशा एफसीने गतमोसमातील चार खेळाडूंना निरोप दिला. यामध्ये गोलरक्षक डायलन डिसिल्वा, बचावपटू सेबॅस्टियन थांगमुआंगसांग, मध्यरक्षक ओसामा मलिक व संघाचा माजी कर्णधार विनीत राय यांचा समावेश आहे.

विनीत जानेवारी 2022 मध्ये मुंबई सिटी संघात लोनवर दाखल झाला. एकंदरीत तो ओडिशातर्फे 70 सामने खेळला. आगामी मोसमात ओडिशा एफसी संघ नवे प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखालील खेळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com