GCA Election: निवडणूक रद्द करुन मला अध्यक्ष 'करा'; महेश देसाई यांची मागणी

लोकपाल राजीव लोचन मेहरोत्रा ​​यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
Mahesh Desai And Vipul Phadke
Mahesh Desai And Vipul PhadkeDainik Gomantak
Published on
Updated on

सनी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष महेश देसाई यांनी गोवा क्रिकेट असोसिएशनचे GAC अध्यक्ष विपुल फडके यांच्या विरोधात लोकपाल राजीव लोचन मेहरोत्रा ​​यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. पत्रात त्यांनी ऑक्टोंबर 2022ला झालेली निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. देसाई हे माजी रणजी ट्रॉफी खेळाडू आणि सनी स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष आहेत.

गोवा क्रिकेट असोसिएशनच्या व्यवस्थापकीय समितीच्या निवडणुकीवर प्रभाव टाकून असोसिएशनच्या निधीचा बेकायदेशीर आणि गुन्हेगारी गैरवापर करून बीसीसीआयच्या निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप महेश देसाई यांनी विपुल फडकेंवर केला आहे.

Mahesh Desai And Vipul Phadke
Goa Politics : आप आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार? मुख्यमंत्र्यांच्या भेटीने चर्चेला उधाण

लोकपालांना लिहीलेल्या पत्रात देसाई यांनी असे नमुद केले की, 27 ऑक्टोंबर 2022 रोजी असोसिएशनची निवडणूक झाली. या निवडणूकीत निधीचा बेकायदेशीर आणि गुन्हेगारी गैरवापर केल्याने बीसीसीआयच्या आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आले. त्यामुळे जीसीएच्या व्यवस्थापकीय समितीची निवडणूक रद्दबातल घोषित करण्यात यावी.

तुम्हाला सध्याच्या तक्रारीची दखल घेण्याचे आणि गोवा क्रिकेट असोसिएशन GCA आणि बीसीसीआयच्या BCCI नियमांनुसार योग्य प्रक्रियेचे पालन करून त्यावर निर्णय घेण्याचे आवाहन करतो. गोवा क्रिकेट असोसिएशन 2022/2025 च्या अध्यक्षपदी विपुल फडके यांची निवडणूक रद्दबातल ठरवा आणि मला 2022/2025 या कालावधीसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून घोषित करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या कालावधीत त्या अध्यक्षपदासाठी इतर कोणतेही उमेदवार निवडणूक लढवत नव्हते असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com