MS Dhoni: धोनीच्या मानहानी दावा प्रकरणाबाबत IPS अधिकाऱ्याला धक्का, मद्रास हायकोर्टाने घेतला मोठा निर्णय

धोनीने तमिळनाडूमधील एका आयपीएस अधिकाऱ्याविरुद्ध मानहानीचा 100 कोटी रुपयांचा खटला दाखल केला होता.
MS Dhoni
MS Dhoni Dainik Gomantak
Published on
Updated on

MS Dhoni filed complaint against a IPS officer: भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी फक्त भारतातच नाही, तर जगभरातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे सातत्याने तो चर्चेत येत असतो. आता नुकतेच असे समोर आले आहे की धोनीने आयपीएस अधिकारी संपत कुमार यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी निर्णय दिला की तामिळनाडूमधील आयपीएस अधिकारी संपत कुमार यांच्याविरुद्ध धोनीच्या न्यायालयाच्या अवमान याचिकेवर सुनावणी होईल. दरम्यान न्यायालयाच्या अवमानाच्या प्रकरणांची सुनावणी केवळ गुरुवारी होत असल्याने या याचिकेवरही 15 जून रोजी सुनावणी होणार आहे.

MS Dhoni
MS Dhoni meet Mohammad Kaif: सर्जरीनंतर धोनीची कैफ फॅमिलीशी 'ग्रेट भेट'! जुन्या मित्राच्या मुलाला 'ती' गोष्ट सांगत केले खूश

धोनीने आयपीएल 2013 मध्ये झालेल्या सट्टेबाजी प्रकरणात त्याचे नाव ओढल्याबद्दल १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता. त्यानंतर संपत कुमार यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले होते, ज्यात न्यायालयीन व्यवस्थेविरुद्ध आणि राज्याचे प्रतिनिधित्व करणारे एक नामवंत वकील यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली होती.

तामिळनाडूचे ऍडव्होकेट जनरल आर. शणमुगसुंदरम यांनी 41 वर्षीय धोनीला याचिकेवर सुनावणीची परवानगी दिली आहे.. संपत कुमार यांनी केलेल्या टिप्पणीमुळे न्यायालयीन कामकाजाचा अवमान झाल्याचे मान्य झाल्यानंतर आर. शणमुगसुंदरम यांनी एमएस धोनीला याचिकेसाठी परवानगी दिली.

MS Dhoni
MS Dhoni tips to KS Bharat: WTC फायनलसाठी केएस भरतला धोनीने काय दिल्या टीप्स? स्वत:च केलाय खुलासा

साल 2013 मध्ये आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरण समोर आले होते. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्सचे तीन खेळाडू दोषी आठळले होते, तर सट्टेबाजी प्रकरणात राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघाच्या मालकांचे नाव समोर आले होते. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघाला 2016 आणि 2017 या दोन वर्षांसाठी बंदीला सामोरे जावे लागले होते.

धोनी 2008 पासून चेन्नई सुपर किंग्सकडून आयपीएल खेळतो. तो केवळ 2016 आणि 2017 मध्ये चेन्नईवर बंदी असताना रायझिंग पुणे सुपर जायंट्सकडून आयपीएल खेळला. त्यानंतर पुन्हा तो चेन्नई संघात परतला. चेन्नईकडून खेळताना त्याने प्रत्येक हंगामात संघाचे नेतृत्वही केले असून 5 वेळा संघाला आयपीएल विजेतेपदही जिंकून दिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com