हार्दिक पांड्याची दक्षिण अफ्रिका दौऱ्यातून माघार, BCCI कडे मागितला वेळ

“हर्दिक पांड्याने (Hardik Pandya) , काही काळ रजा मागितली असून, निवडीसाठी त्याचा विचार न करण्याची विनंती बीसीसीआयला (BCCI) केली आहे.
दक्षिण आफ्रिका मालिकेत हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) भारतीय संघात (Indian team) स्थान देण्यात येणार नाही.

दक्षिण आफ्रिका मालिकेत हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) भारतीय संघात (Indian team) स्थान देण्यात येणार नाही.

Dainik Gomantak
Published on
Updated on

कोविड-19 (Covid 19) च्या नवीन प्रकारामुळे भारताचा दक्षिण आफ्रिका (South Africa) दौरा धोक्यात येऊ शकतो, पण जर दौरा झालाच तर त्या मालिकेत हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) भारतीय संघात (Indian team) स्थान देण्यात येणार नाही. हार्दिक पांड्या आता काही काळ फिटनेसवर लक्ष केंद्रित करणार असून त्याने पुनरागमन करण्यासाठी बीसीसीआयकडे (BCCI) वेळ मागितला आहे. त्याला फक्त फलंदाज म्हणून संघात परतायचे नाही, असे त्याने सांगितले आहे.

<div class="paragraphs"><p>दक्षिण आफ्रिका मालिकेत हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) भारतीय संघात (Indian team) स्थान देण्यात येणार नाही.</p></div>
हार्दिक पांड्या खरच 'ऑलराउंडर'? कपिल देव यांचा सवाल

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका माध्यमाला दिलेल्या माहितीनुसार, “हर्दिक पांड्याने, काही काळ रजा मागितली असून, निवडीसाठी त्याचा विचार न करण्याची विनंती बीसीसीआयला केली आहे. पाठीच्या दुखापतीतून तो बरा होऊन, बीसीसीआय आणि एनसीएच्या पुनर्वसन प्रोटोकॉलचे तो पालन करेल. पांड्या संघात कधी परतेल हे मी सांगू शकत नाही. आम्हाला आशा आहे की तो वेस्ट इंडिज मालिकेसाठी उपलब्ध होईल, परंतु सध्या तरी हे सांगणे कठीण आहे.

बीसीसीआयने हार्दिक पांड्याला एनसीएला अहवाल देण्याचे आणि फिटनेस कार्यक्रम पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, हार्दिक पंड्याने या आदेशाकडे दुर्लक्ष केले आणि पाठीच्या दुखापतीही खेळणे सुरूच ठेवले.

दक्षिण आफ्रिकेला जाण्याऐवजी, हार्दिक पांड्या आता विश्रांती घेणार असून, योग्य वेळी एनसीएमध्ये सामील होणार आहे. त्याला केवळ फलंदाज म्हणून संघात ठेवण्यात काही अर्थ नाही, असे या अधिकाऱ्याने सांगितले. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे पुनरागमन 2022 च्या टी20 विश्वचषकात महत्त्वाचे ठरु शकते.

<div class="paragraphs"><p>दक्षिण आफ्रिका मालिकेत हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) भारतीय संघात (Indian team) स्थान देण्यात येणार नाही.</p></div>
T20 World Cup: हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार की नाही ते अखेर विराटने केले स्पष्ट

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, “तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. आम्हाला टी-20 विश्वचषकापूर्वी या अष्टपैलू खेळाडूची आवश्यकता असेल. त्यामुळे मला वाटते की त्याने थोडा वेळ सुट्टी घेण्याचा चांगला निर्णय घेतला आहे. तो आल्यावर त्याने पुन्हा गोलंदाजी करणे हे त्याच्यासाठीच नव्हे तर भारतीय संघासाठी देखील महत्त्वाचे आहे. बीसीसीआय त्याला शक्य ती सर्व मदत करेल.”

  • हार्दिक पांड्याला पुन्हा पाठीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. ज्याने त्याला सहा महिन्यांहून अधिक काळ क्रिकेटपासून बाहेर ठेवले होते.

  • तो सध्या गोलंदाजी करु शकत नाही. हे त्याच्या विरोधात जात आहे.

  • त्याने T20 विश्वचषकात गोलंदाजी केली होती. परंतु तो अजूनही त्याचे 100% देऊ शकला नाही.

  • त्याला न्यूझीलंड मालिकेतून वगळण्यात आले आणि विश्रांती घेण्यास सांगण्यात आले.

दरम्यान, त्याला विजय हजारे ट्रॉफीमध्ये न खेळण्याचा सल्ला देण्यात आला आहे, मात्र याबाबतचा अंतिम निर्णय त्याला घ्यायचा आहे. फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून पुनरागमन करण्यासाठी हार्दिकने थोडा वेळ सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com