Quinton de Kock: मुंबईविरुद्ध निर्णायक सामन्यात डी कॉकला का ठेवले संघाबाहेर? LSG कॅप्टन कृणाल पंड्याने दिले उत्तर

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या IPL 2023 एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने क्विंटन डी कॉकला प्लेइंग इलेव्हनमध्येच नाही, तर राखीव खेळाडूंमध्येही संधी दिली नव्हती.
Quinton de Kock | Krunal Pandya
Quinton de Kock | Krunal PandyaDainik Gomantak

Why Quinton de Kock not played Eliminator: बुधवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत झालेल्या एलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला मुंबईने इंडियन्सने 81 धावांनी पराभूत केले. या पराभवानंतर लखनऊ सुपर जायंट्सचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

दरम्यान, एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने दिलेल्या 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 16.3 षटकात सर्वबाद 101 धावाच करता आल्या. लखनऊच्या या पराभवामागे क्विंटन डी कॉकला संधी न देणे हे एक कारण सांगितले जात आहे.

अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकऐवजी या सामन्यात फलंदाजीसाठी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून काईल मेयर्स मैदानात उचरला होता. विशेष म्हणजे डी कॉकला राखीव खेळाडूंमध्येही संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे लखनऊ संघावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली.

Quinton de Kock | Krunal Pandya
IPL 2023: गेल्यावर्षी 9 वा क्रमांक, पण यंदा थेट फायनलमध्ये! CSK च्या 'परफेक्ट कमबॅक'ची 5 कारणे

पण , सामना संपल्यानंतर डी कॉकला न खेळवण्यामागचे कारण लखनऊचा कर्णधार कृणाल पंड्याने स्पष्ट केले आहे. त्याने सांगितले की 'नक्कीच हा कठीण निर्णय होता. क्विंटन डी कॉक दर्जेदार खेळाडू आहे, शानदार फलंदाज आहे. पण इथे (एमए चिदंबरम स्टेडियम) काईल मेयर्सची कामगिरी चांगली झाली आहे. त्यामुळे आम्हाला वाटले की आम्ही काईलला संधी द्यायला हवी.'

क्विंटन डी कॉक लखनऊकडून पहिले 10 सामने देखील खेळला नव्हता. पण नियमित कर्णधार केएल राहुल दुखापतग्रस्त झाल्यानंतर डी कॉकला संधी मिळाली. त्याने 4 सामन्यांत खेळताना 143 धावाही केल्या होत्या.

Quinton de Kock | Krunal Pandya
IPL 2023 Video: नवीनचा मुंबईविरुद्ध कहर! हिटमॅनसह 4 फलंदाजांना केलं आऊट, हटके सेलिब्रेशनचीही चर्चा

दरम्यान, संघाच्या पराभवाची जबाबदारी कृणालने स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे. कृणाल म्हणाला, 'आम्ही चांगल्या स्थितीत होतो. मला वाटते ज्यावेळी मी तो शॉट खेळला, जो योग्य नव्हता आणि तेव्हापासून सर्व गोष्टी बदलल्या. मी पूर्णपणे जबाबदारी घेतो.

'मला म्हणायचे आहे की त्या परिस्थितीत आम्ही तिथे चांगले क्रिकेट खेळायला हवे होते, पण हो, मी खेळलेला शॉट चांगला नव्हता. आम्ही ज्याप्रकारे सामना संपवला, त्याची जबाबदारी मी घेतो.'

या सामन्यात लखनऊने 183 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर काईल मेयर्स आणि प्रेरक मंकड यांच्या विकेट्स 23 धावांवर गमावल्या होत्या. पण त्यानंतक कृणाल आणि मार्कस स्टॉयनिस यांनी डाव सावरला होता.

या दोघांनी 46 धावांची भागीदारी केली होती. पण कृणाल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात टीम डेव्हिडकडे झेल देत 8 धावांवर बाद झाला. त्यानंतर 32 धावातच लखनऊने 7 विकेट्स गमावल्या. मुंबई इंडियन्सकडून या सामन्यात आकाश मधवालने शानदार गोलंदाजी करताना 5 धावांत 5 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com