Lionel Messi आता पी एस जीकडून घालू शकतो 'या' नंबर ची जर्सी

बार्सिलोना मध्ये १० नंबरची जर्सी घालून खेळणारा मेस्सी आता नवीन जर्सी मध्ये दिसेल
Lionel Messi is set to join PSG
Lionel Messi is set to join PSGDainik Gomantak
Published on
Updated on

एफ सी बार्सिलोनाला (FC Barcelona) भावनिक निरोप दिल्यानंतर लिओनल मेस्सी (Lionel Messi) आता थेट पी एस जी (PSG) म्हणजेच पॅरिस सेंट जर्मेन या संघाकडून खेळेल असे वृत्त समोर आले आहे.

बार्सिलोना मध्ये १० नंबरची जर्सी घालून खेळणारा मेस्सी आता नवीन जर्सी मध्ये दिसेल. १० नंबर हा मेस्सीसाठी भाग्यशाली आहे हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती आहे मात्र नवीन संघाकडून खेळताना मेस्सी १९ नंबर ची जर्सी घालून खेळेल अशी माहिती आहे. सध्या पी एस जी मध्ये १० नंबरची जर्सी नेमारच्या नावानी आहे. (Lionel Messi may wear this jersey number at PSG)

Lionel Messi is set to join PSG
Tokyo Olympics: भारताची सप्तपदी!

मात्र मेस्सी ने पी एस जी संघ निवडला आहे. मेसीचे वडील जॉर्ज हेच मेस्सीचे ऐजंट आहेत. त्यांची फ्रेन्च संघाबरोबर चर्चादेखील झाली असल्याचे वृत्त हाती आले होते. मेस्सीचा कॉन्ट्रॅक्ट देखील लवकरच करण्यात येईल, असे कळत आहे. पी एस जीचे संचालक नसीर अल खेलाफी हे देखील मेस्सी बरोबर काही दिवसांपासून चर्चा करत होते. एका वृत्तानुसार मेस्सी पी एस जी संघाबरोबर २ वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट करेल.

गेल्या काही दिवसापासून मेस्सी बार्सिलोना सोडणार या चर्चेला उधाण आलं होतं. मागील आठवड्यात एफ सी बार्सिलोनाने आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली कि मेस्सी आता स्पॅनिश क्लबकडून खेळणार नाही. ही बातमी पसरताच मेस्सी कुठल्या क्लबकडून खेळतो याची सगळ्या जगाला उत्सुकता लागून राहिली होती. आता मात्र या गोष्टीला पूर्णविराम दिल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मेस्सी मँचेस्टर सिटीकडून खेळू शकतो अशी देखील चर्चा होती.

फुटबॉलचे दैवत म्हुणुन ओळख असलेल्या मेस्सी ने एफ सी बार्सिलोना बरोबर पुढचा करार न करण्याचं ठरवलं आणि फुटबॉल जगतात एकच खळबळ उडाली. तब्बल 778 सामने, 672 गोल्स आणि 35 चषक मिळवून दिल्यानंतर मेस्सी आणि बार्सिलोना हे अविस्मरणीय नातं रविवारी संपलं.

Lionel Messi is set to join PSG
IND vs ENG: आम्हाला 95 धावांची भक्कम आघाडी मिळेल अशी अपेक्षा नव्हती - कोहली

मेस्सी फ्रान्सच्या पी एस जी संघाकडून खेळणार म्हुणुन आयफेल टॉवर देखील आरक्षित केल्याचे कळत आहे. फ्रेंच क्लब मेस्सीची घोषणा थेट आयफेल टॉवर वरून करणार आहेत. त्याच दरम्यान मेस्सीची वैद्यकीय चाचणी देखील काही दिवसात होण्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com