मेस्सी पुरुषांमध्ये, तर बोनमाटी महिलांमध्ये FIFA The Best पुरस्काराची मानकरी, पाहा विजेत्यांची लिस्ट

FIFA Awards 2023: लंडनमध्ये 15 जानेवारीला फिफा द बेस्ट 2023 पुरस्कार सोहळा पार पडला.
Lionel Messi - Aitana Bonmatí
Lionel Messi - Aitana Bonmatí X/FIFAcom and FIFAWWC

Lionel Messi and Aitana Bonmati win best player awards at FIFA The Best 2023:

लंडनमध्ये सोमवारी (15 जानेवारी) फिफा द बेस्ट 2023 पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनल मेस्सीला सर्वोत्तम पुरुष फुटबॉलपटूचा पुरस्कार देण्यात आला. तसेच स्पेनची मिडफिल्डर ऐताना बोनमाटीला सर्वोत्तम महिला पुरस्कार देण्यात आला.

लिओनल मेस्सी सर्वोत्तम पुरुष फुटबॉलर

सध्या इंटर मियामीकडून खेळणाऱ्या मेस्सीने मँचेस्टर सिटीच्या एर्लिंग हॉलंड आणि पॅरिस सेंट जर्मेनच्या किलियन एमबाप्पे यांना मागे टाकत फिफा द बेस्ट 2023 पुरस्कार जिंकला. 19 डिसेंबर 2022 ते 20 ऑगस्ट 2023 या दरम्याच्या काळातील कामगिरी या पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात आली होती.

या कालावधीत मेस्सीने पीएसजीकडून खेळताना त्यांना लीग 1 स्पर्धेचे विजेतेपद जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तसेच नंतर तो पीएसजीतून अमेरिकन फुटबॉल क्लब इंटर मियामीमध्ये सामील झाला. त्याने इंटर मियामीला पहिल्यांदाच लीग कप जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.

आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये मेस्सीने CONMEBOL 2026 फिफा वर्ल्डकप क्वालिफिकेशनमध्ये अर्जेंटिनाला गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर पोहचवण्यात मदत केली होती.

Lionel Messi - Aitana Bonmatí
Messi Video: 'तू जिथे कुठे आहेस मॅराडोना...', आठव्यांदा बॅलन डी'ओर नावावर करताच मेस्सीने मनंही जिंकली

दरम्यान, मेस्सी लंडनमध्ये फिफाचा पुरस्कार स्विकारण्यासाठी उपस्थित राहू शकला नाही. 8 वेळचा बॅलन डी'ओर पुरस्कार विजेत्या मेस्सीने त्याच्या कारकिर्दीत तिसऱ्यांदा फिफा द बेस्ट पुरस्कार जिंकला आहे. यापूर्वी त्याने 2019 आणि 2022 सालचा फिफा द बेस्ट पुरस्कार जिंकला आहे.

ऐताना बोनमाटी सर्वोत्तम महिला फुटबॉलर

बार्सिलोना क्लबकडून खेळणारी ऐताना बोनमाटी हिला महिला फिफा द बेस्ट 2023 पुरस्काराने गौरविण्यात आले. तिच्यासाठीही हे वर्ष शानदार राहिले. तिने गेल्या वर्षभरात स्पेनला महिला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान दिले.

तसेच तिने बार्सिलोनाला लीग एफ स्पर्धाही जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तिला UEFA वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला आहे. तिने फिफा द बेस्ट 2023 पुरस्कार मिळवताना लिंडा कैसेडो आणि जेनी हर्मोसो यांना मागे टाकले.

Lionel Messi - Aitana Bonmatí
Ronaldo vs Messi: रोनाल्डो-मेस्सी पुन्हा येणार आमने-सामने! सामन्याची तारीखही ठरली

फिफा द बेस्ट पुरस्कार (पुरुष)

  • सर्वोत्तम खेळाडू - लिओनल मेस्सी (अर्जेंटिना, पीएसजी, इंटर मियामी)

  • फिफा पुस्कास पुरस्कार - गुलहेर्मे मद्रुगा (ब्राझील, बोटाफोगो-एसपी)

  • फिफा फेअर प्ले पुरस्कार - ब्राझील पुरुष संघ

  • सर्वोत्तम पुरुष प्रशिक्षक - पेप गार्डिओला (स्पेन, मँचेस्टर सिटी)

  • सर्वोत्तम गोलकिपर - एडरसन (मँचेस्टर सिटी)

  • फिफा फॅन पुरस्कार - ह्यूगो मिगुएल इनिग्वेझ

  • फिफा वर्ल्ड इलेव्हन -

    • गोलकिपर - थिबॉट कोर्टोइस (ब्राझील, मँचेस्टर सिटी)

    • डिफेंडर - जॉन स्टोन्स (मँचेस्टर सिटी), काईल वॉकर (मँचेस्टर सिटी), रुबेन डायस (मँचेस्टर सिटी)

    • मिडफिल्डर - बर्नार्डो सिल्वा (मँचेस्टर सिटी), ज्युड बेलिंगहॅम (रिअल माद्रिद), केविन डी ब्रुयन (मँचेस्टर सिटी)

    • फॉरवर्ड - एर्लिंग हॉलंड (मँचेस्टर सिटी), किलियन एमबाप्पे (पीएसजी), लिओनल मेस्सी (इंटर मियामी), विनिसियस ज्युनियर (रिअर मद्रिद)

फिफा द बेस्ट पुरस्कार (महिला)

  • सर्वोत्तम खेळाडू - ऐताना बोनमाटी (स्पेन, बार्सिलोना)

  • सर्वोत्तम महिला प्रशिक्षक - सरिना विगमन (नेदरलँड्स, इंग्लंड महिला संघ)

  • सर्वोत्तम गोलकिपर - मेरी इअरप्स (इंग्लंड, मँचेस्टर युनायटेड)

  • फिफा फेअर प्ले पुरस्कार - ब्राझील पुरुष संघ

  • फिफा फॅन पुरस्कार - ह्यूगो मिगुएल इनिग्वेझ

  • फिफा वर्ल्ड इलेव्हन -

    • गोलकिपर - मेरी इअरप्स (मँचेस्टर युनायडेट)

    • डिफेंडर - ओल्गा कार्मोना (रिअल माद्रिद), लुसी ब्राँझ (बार्सिलोना), अॅलेक्स ग्रीनवुड (मँचेस्टर सिटी)

    • मिडफिल्डर - केयरा वॉल्श (मँचेस्टर सिटी), अलेसिया रुसो (आर्सनल), लॉरेन जेम्स (चेल्सी), एला टून (मँचेस्टर युनायटेड), ऐताना बोनमाटी (बार्सिलोना)

    • फॉरवर्ड - ऍलेक्स मॉर्गन (सॅन दियागो वेव), सॅम केर (चेल्सी)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com