Roger Federer Retirement: टेनिस जगताचा बादशहा स्वीडनचा महान टेनिसपटू रॉजर फेडररने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने आज आपल्या ट्विटर हँडलवरुन निवृत्तीची घोषणा केली. 20 ग्रँडस्लॅम जिंकणारा फेडरर गेल्या काही वर्षांपासून दुखापतीशी झुंज देत होता. यामुळे त्याला अनेकवेळा शस्त्रक्रियेचाही सामना करावा लागला होता. दुखापतीमुळे आणि शस्त्रक्रियेमुळे रॉजर गेल्या काही वर्षांपासून टेनिस कोर्टवर आपली आक्रमकता दाखवू शकत नव्हता. दरम्यान, रॉजरने निवृत्ती जाहीर केली आहे. लंडनमधील एटीपी स्पर्धेतील लेव्हर कप ही त्याची शेवटची स्पर्धा असणार आहे.
फेडररने निवृत्तीची घोषणा केली
ग्रँड स्लॅम विजेता रॉजर फेडररने (Roger Federer) एक विशेष नोट लिहून निवृत्तीची घोषणा केली आहे. 24 वर्षांच्या प्रदीर्घ टेनिस (Tennis) कारकिर्दीत आपल्याला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचे त्याने आभार मानले आहेत. त्याचबरोबर, त्याने पत्नी मिर्का हिचेही आभार मानले. फेडररने आपल्या नोटमध्ये लिहिले की, 'तुम्हा सर्वांना माहित आहे की, गेल्या तीन वर्षांत मी दुखापती आणि शस्त्रक्रियांच्या रुपात अनेक आव्हानांचा सामना केला. मी पुन्हा कोर्टवर परतण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. पण मला माझ्या शरीराच्या मर्यादा माहीत आहेत.'
फेडरर नोटमध्ये पुढे लिहिले की, 'मी 41 वर्षांचा आहे. 24 वर्षांच्या माझ्या कारकिर्दीत मी 1500 हून अधिक सामने खेळलो. टेनिसने मला माझ्या स्वप्नांपेक्षा खूप काही दिले. पण आता माझ्यावर टेनिसमधून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. पुढील आठवड्यापासून लंडनमधील (London) लेव्हर कप ही माझ्या कारकिर्दीतील अंतिम एटीपी स्पर्धा असेल. मी भविष्यात टेनिस नक्कीच खेळेन पण ग्रँडस्लॅम किंवा एटीपी टूरमध्ये नाही.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.