World Record: क्रिकेटच्या इतिहासात चमत्कार! एकाच ओव्हरमध्ये लगावले 8 षटकार; 'या' धाकड फलंदाजाच्या नावावर अशक्यप्राय वर्ल्ड रेकॉर्ड

World Record 8 Sixes In Cricket: कँटरबरी संघातून खेळताना ली जर्मनने वेलिंग्टनविरुद्ध हा पराक्रम केला. शेल ट्रॉफीच्या या सामन्याच्या शेवटच्या दिवशी वेलिंग्टनने आपला डाव घोषित करुन कँटरबरीला 59 षटकांत 291 धावांचे लक्ष्य दिले होते.
World Record 8 Sixes In Cricket
World RecordDainik Gomantak
Published on
Updated on

World Record 8 Sixes In Cricket: क्रिकेटच्या मैदानात सहा चेंडूंत सहा षटकार मारल्याचे आपण अनेकदा ऐकले असेल, पण एका फलंदाजाने चक्क एकाच षटकात 8 षटकार ठोकण्याचा 'असंभव' वाटणारा वर्ल्ड रेकॉर्ड केला. न्यूझीलंडचा माजी फलंदाज 'ली जर्मन' याने क्रिकेटच्या मैदानावर असा काही धुमाकूळ घातला होता की, जो संपूर्ण जगासाठी आजही एक स्वप्नवत गोष्ट वाटू शकतो. एकाच षटकात 8 षटकार आणि एकूण 70 धावा ठोकून या फलंदाजाने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली होती. त्याच्या या तुफानी फटकेबाजीसमोर विरोधी संघाचे गोलंदाज हतबल दिसले होते.

ही अविश्वसनीय घटना 20 फेब्रुवारी 1990 रोजी न्यूझीलंडमधील एका प्रथम श्रेणी सामन्यादरम्यान घडली होती. कँटरबरी संघातून खेळताना ली जर्मनने वेलिंग्टनविरुद्ध हा पराक्रम केला होता. शेल ट्रॉफीच्या या सामन्याच्या शेवटच्या दिवशी वेलिंग्टनने आपला डाव घोषित करुन कँटरबरीला 59 षटकांत 291 धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यात वेलिंग्टनचा गोलंदाज बर्ट वेंस गोलंदाजीसाठी आला आणि त्या एका षटकाने क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागड्या ओव्हरचा विक्रम नोंदवला गेला.

World Record 8 Sixes In Cricket
T20 World Record: 122 षटकार, 127 चौकार! भारतीय वंशाच्या खेळाडूची 'विराट' खेळी, गोलंदाजांसाठी ठरला काळ; टी20 मध्ये केला अचाट रेकॉर्ड

वास्तविक, एका षटकात सहा चेंडू असतात, मात्र बर्ट वेंसने या षटकात तब्बल 22 चेंडू टाकले. वेंसने आपल्या षटकाची सुरुवात सलग 'नो बॉल' टाकून केली. धक्कादायक बाब म्हणजे, त्याने टाकलेल्या पहिल्या 17 चेंडूंपैकी फक्त एकच चेंडू वैध (Legal) होता. या संधीचा फायदा घेत ली जर्मनने वेंसच्या गोलंदाजीचे अक्षरशः वाभाडे काढले. त्याने या एकाच षटकात 8 षटकार आणि 5 चौकार मारत स्वतःचे शतकही पूर्ण केले. या एकाच ओव्हरमध्ये 77 धावा आल्या होत्या, त्यापैकी 70 धावा एकट्या ली जर्मनने काढल्या होत्या, तर 5 धावा त्याचा सहकारी रॉजर फोर्डने काढल्या आणि उरलेल्या 2 धावा अवांतर स्वरुपात मिळाल्या होत्या.

World Record 8 Sixes In Cricket
World Record: 6 चेंडू, 5 विकेट्स... मलिंगा, बुमराहला जमलं नाही, ते 'इंडोनेशियन गोलंदाजा'नं करुन दाखवलं! रचला इतिहास

बर्ट वेंसच्या नावावर क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडे षटक टाकण्याचा नकोसा विक्रम आजही कायम आहे. या ऐतिहासिक षटकानंतर कँटरबरी संघाला विजयासाठी शेवटच्या षटकात 18 धावांची गरज होती. ली जर्मनने पहिल्या पाच चेंडूंत 17 धावा कुटल्या, मात्र शेवटच्या चेंडूवर त्याला धाव घेता आली नाही आणि हा थरारक सामना अनिर्णित स्थीतीत संपला. जरी सामना ड्रॉ झाला असला, तरी ली जर्मनने एका षटकात 8 षटकार मारुन नोंदवलेला हा जागतिक विक्रम आजही क्रिकेट रसिकांच्या अंगावर शहारे आणणारा ठरतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com