T20 World Record: 122 षटकार, 127 चौकार! भारतीय वंशाच्या खेळाडूची 'विराट' खेळी, गोलंदाजांसाठी ठरला काळ; टी20 मध्ये केला अचाट रेकॉर्ड

Karanbir Singh T20I World Record: करणबीर सिंहने 2025 या वर्षात ऑस्ट्रियाचे प्रतिनिधित्व करताना हे ऐतिहासिक यश संपादन केले.
Karanbir Singh T20I World Record
Karanbir SinghDainik Gomantak
Published on
Updated on

Karanbir Singh T20I World Record: टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित होतात आणि मोडले जातात, परंतु एक असा जागतिक विक्रम आहे जो भविष्यात कोणत्याही फलंदाजाला मोडणे जवळपास अशक्य वाटत आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय धावा करण्याचा हा पराक्रम भारतीय वंशाच्या आणि ऑस्ट्रियाकडून खेळणाऱ्या करणबीर सिंह याने करुन दाखवला. त्याने एकाच वर्षात तब्बल 1488 धावांचा डोंगर उभा करुन क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली. बहुतेक लोकांसाठी ही संख्या अविश्वसनीय वाटू शकते, परंतु या वादळी कामगिरीची साक्ष संपूर्ण जगाने दिली.

करणबीर सिंहने 2025 या वर्षात ऑस्ट्रियाचे (Austria) प्रतिनिधित्व करताना हे ऐतिहासिक यश संपादन केले. त्याने त्या वर्षात खेळलेल्या 32 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 51.31 च्या सरासरीने आणि 174.85 च्या स्फोटक स्ट्राईक रेटने 1488 धावा कुटल्या. त्याच्या या खेळीत 2 शतके आणि 13 अर्धशतकांचा समावेश होता, तर 115 ही त्याची त्या वर्षातील सर्वोच्च धावसंख्या ठरली. विशेष म्हणजे, धावांच्या या ओघात त्याने 127 चौकार आणि 122 षटकारांची आतिषबाजी केली होती. टी20 क्रिकेटच्या इतिहासात एका वर्षात एखाद्या फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक वैयक्तिक धावा आहेत.

Karanbir Singh T20I World Record
World Record: T20 क्रिकेटमध्ये चमत्कार! षटकार न मारता 350 धावांची विक्रमी भागीदारी; 'गिनीज बुक'मध्ये नोंद

30 वर्षांच्या करणबीर सिंहने 25 मे 2024 रोजी बेल्जियमविरुद्ध खेळताना आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तो केवळ एक आक्रमक फलंदाज नसून मध्यमगती गोलंदाज म्हणूनही संघासाठी उपयुक्त ठरला. आतापर्यंत त्याने ऑस्ट्रियासाठी 47 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, 51.72 च्या सरासरीने एकूण 2069 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 18 अर्धशतकांचा समावेश असून 128* ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

Karanbir Singh T20I World Record
T20 International New World Record: T20 इंटरनॅशनलमध्ये 'या' खेळाडूने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड! पहिल्यांदाच 7 विकेट घेत...

त्याच्या एकूण कारकिर्दीत 175 चौकार आणि 166 षटकारांची नोंद आहे. गोलंदाजीमध्ये त्याने 34 बळी घेतले असून 42 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. करणबीरने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नुकताच 2 मे 2026 रोजी जर्मनीविरुद्ध खेळला आहे. फलंदाजांच्या या झंझावाताने प्रस्थापित केलेला एका वर्षातील 1488 धावांचा विक्रम मोडणे कोणत्याही दिग्गजासाठी एक मोठे आव्हान असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com