Kylian Mbappé: एमबाप्पे अन् PSG चा मार्ग वेगळा होणार? स्टार फुटबॉलर म्हणतोय...

कायलिन एमबाप्पे पॅरिस सेंट-जर्मेन क्लबला सोडून रिअल मद्रिदमध्ये जाण्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे, अशातच त्यानेच ट्वीट करत याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
Kylian Mbappé
Kylian MbappéDainik Gomantak

Kylian Mbappé decided not to extend his Paris Saint-Germain contract into 2025: मागील अनेक दिवसांपासून फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू कायलिन एमबाप्पे पॅरिस सेंट-जर्मेन क्लबला सोडून रिअल मद्रिदमध्ये जाण्याच्या चर्चा होत आहे. आता रिअल मद्रिदसाठी त्याला करारबद्ध करण्यासाठी दरवाजेही खुले आहेत. कारण एमबाप्पेने तो पीएसजीबरोबर 2025 पर्यंत करार वाढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सध्या करिम बेंझेमा रिअल मद्रिदमधून बाहेर झाल्याने त्यांना एका स्टार स्ट्रायकरची गरज आहे. त्यामुळे या जागेवर एमबाप्पेसाठी चांगली संधी आहे.

Kylian Mbappé
Lionel Messi to Inter Miami: मेस्सीनं धुडकावली सौदीतील महागडी ऑफर? 'या' अमेरिकन क्लबमध्ये सामील होण्यास सज्ज

मद्रिद गेल्या दोन हंगामांपासून एमबाप्पेला करारबद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. पण 2021 मध्ये एमबाप्पेसाठी 180 मिनियन युरोजची रिअल मद्रिदची ऑफर पीएसजीने नाकारली होती. तसेच गेल्यावर्षीही एमबाप्पेने मद्रिदची ऑफर नाकारताना पीएसजीबरोबर नवीन करार केला होता. ज्यात एक ज्यादाच्या एका वर्षाचाही पर्याय होता.

पण आता त्याने पीएसजीला सांगितले आहे की तो पुढील हंगामानंतर त्याच्या करारात आणखी एका वर्षाची वाढ करणार नाही.

त्यात अतिरिक्त वर्षाचा पर्याय समाविष्ट होता. आता त्याने क्लबला सांगितले आहे की तो त्याच्या करारावर 12 महिन्यांचा विस्तार सुरू करणार नाही, जो पुढील हंगामाच्या शेवटी संपेल. दरम्यान एसोसिएट प्रेसला एका सुत्राने नाव न सांगण्याच्या अटीवरून दिलेल्या माहितीनुसार एमबाप्पेला फ्रि एजंट म्हणून सोडण्यास पीएसजी तयार नाही.

त्यामुळे त्याला यंद्याच्या हंगामात शक्य असल्यास त्याला करारबद्द करण्यासाठी मद्रिद आणि अन्य क्लबमध्ये चूरस आहे.

Kylian Mbappé
Barcelona vs Real Madrid: बार्सिलोनाने पटकावला स्पॅनिश सुपरकप! 18 वर्षीय गावी विजयाचा हिरो

पण याच दरम्यान, एमबाप्पेने एका वृत्तपत्राने त्याला मद्रिदमध्ये जाण्याची इच्छा असल्याची बातमी चूकीची असल्याचे ट्वीट केले होते. या ट्वीटमध्ये तो आणखी एक हंगाम पीएसजीकडून खेळणार असल्याचे त्याने सांगितले.

एमबाप्पेने ट्विटरवर लिहिले 'खोटे, मी आधीच म्हटलो आहे की मी पीएसजीबरोबर पुढील हंगाम असणार आहे.' पण त्याने त्यानंतर आणखी कितीवेळ पीएसजीबरोबर असणार आहे, याबद्दल स्पष्ट केले नाही.

त्यामुळे आता त्याच्या करारबाबत पीएसजी कसा निर्णय घेणार, हे पाहावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com