KNVB Training : गोव्यात भरणार गुरुजींची शाळा; ''परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन भारतासाठी फायदेशीर''

नेदरलँड्स फुटबॉल महासंघाच्या सहकार्याने राज्यात शिबिर
KNVB Training
KNVB TrainingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: परदेशी फुटबॉल प्रशिक्षकांचे मार्गदर्शन राज्यातील फुटबॉल प्रशिक्षकांसाठी फायदेशीर ठरेल, त्यामुळे तांत्रिक बाबी अधिक प्रमाणात विकसित होतील आणि त्याचा लाभ गोव्यासह भारतीय फुटबॉलच्या प्रगतीस होईल, अशी आशा क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सोमवारी व्यक्त केली.

(KNVB global training programme will be guided Goa football coach at panaji)

रॉयल नेदरलँड्स फुटबॉल असोसिएशनच्या (केएनव्हीबी) जागतिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या 32 फुटबॉल प्रशिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येईल. पणजी येथील डॉन बॉस्को ओरेटरी संकुलात सोमवारपासून कार्यशाळेस सुरवात झाली. त्यात नेदरलँड्सचे दोन वेळचे माजी विश्वकरंडक उपविजेते योहान नीस्केन्स, बर्ट झुर्मन यांचे मार्गदर्शन लाभले.

KNVB Training
PAK vs ENG: इंग्लंडने पाकिस्तानची उडवली दाणादाण, पहिल्या कसोटीत 847 धावा करुनही...

क्रीडामंत्री गावडे यांचे पाच दिवशीय शिबिराचे सोमवारी उद्घाटन झाले, त्यानंतर ते बोलत होते. केएनव्हीबी यांच्यातर्फे कर्नाटकातील बंगळूर आणि महाराष्ट्रातील मुंबईनंतर आता गोव्यात शिबिर घेण्यात येत आहे. फुटबॉलमध्ये फक्त खेळने आवश्यक नाही. तर तांत्रिक बाबी, तंदुरुस्ती, दुखापतींपासून सुरक्षा आदींचेही ज्ञान हवे. या शिबिराद्वारे मिळेल.

आम्हाला प्रगती साधायची आहे आणि त्यात परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन भारतीयांसाठी साह्यभूत ठरेल. गोवा क्रीडा प्राधिकरणाचे 32 प्रशिक्षक या शिबिरातील ज्ञानाचा वापर करतील, असे गोविंद गावडे यांनी नमूद केले.

KNVB Training
Team India: चुकीला माफी नाही! पराभवानंतर आता ICC ची टीम इंडियावर कारवाई

हे शिबिर गोमंतकीय फुटबॉलच्या भविष्याच्या दृष्टीने निश्चितच फायदेशीर ठरेल, असा विश्वास योहान नीस्केन्स यांनी व्यक्त केला. यावेळी गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक डॉ. गीता नागवेकर, संयुक्त संचालक (प्रशिक्षण) ब्रुनो कुतिन्हो, डॉन बॉस्को पणजीचे फादर एरविन कार्व्हालो, अकोसा स्पोर्टसचे दीपक खानोलकर देखील उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com