IND vs SL: उपकर्णधारपद गमावलेला केएल राहुलचा वनडे मालिकेसाठी जोरदार सराव, Video व्हायरल

केएल राहुल श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी घाम गाळताना दिसला आहे.
KL Rahul Net Practice
KL Rahul Net Practice Dainik Gomantak
Published on
Updated on

KL Rahul: श्रीलंका संघ सध्या भारत दौऱ्यावर आला असून 10 जानेवारीपासून यजमानांविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतून भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. त्यासाठी तो तयारीलाही लागला आहे.

केएल राहुलला या वनडे मालिकेआधी झालेल्या भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्यावेळी तो अभिनेत्री अथिया शेट्टीबरोबर लग्न करणार असल्याचेही म्हटले जात होते. मात्र अद्याप याबद्दल कोणतेही वृत्त समोर आले नाही.

(KL Rahul net practice before ODI Series against Sri Lanka)

KL Rahul Net Practice
India vs Sri Lanka: 'पंड्यासेने'नं मालिका जिंकताच टीम इंडियाची इंग्लंडच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

दरम्यान, केएल राहुलने नुकताच नेट्समध्ये सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो विविध शॉट्स खेळण्याचा सराव करताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

दरम्यान, केएल राहुल गेल्या काही सामन्यांपासून मोठी खेळी करण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या खराब फॉर्मवर टीकाही झाली होती. अनेक क्रिकेट चाहत्यांकडून तर त्याला संघातून वगळण्याचीही मागणी झाली होती. महत्त्वाचे म्हणजे त्याला मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याला भारतीय संघाचे उपकर्णधारपदही गमवावे लागले आहे.

त्याने गेल्या 5 डावात 25 धावांचा टप्पाही ओलांडलेला नाही. त्याने गेल्या महिन्यात झालेल्या बांगलादेश दौऱ्यात केवळ एक अर्धशतक केले होते.

KL Rahul Net Practice
India vs Sri Lanka 3rd T20 Match: LIVE मॅचमध्येच 'या' खेळाडूचा सुटला संयम! आऊट होताच...

दरम्यान, आता भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात वनडे वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. त्यादृष्टीने त्याच्या कामगिरीवर आगामी काळात सर्वांचेच लक्ष राहाणार आहे.

भारताला श्रीलंकाविरुद्ध खेळायची वनडे मालिका

भारतीय संघ 10 जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळणार असून पहिला सामना गुवाहाटीला होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 12 जानेवारी रोजी कोलकाता येथे होणार आहे. तसेच तिसरा वनडे सामना तिरुअनंतपुरम येथे 15 जानेवारी रोजी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com