IPL 2023: दोन षटकारानं 9 लाखाच्या गाडीसाठी आला एवढ्या लाखाचा खर्च!

Tata Tiago EV in IPL: आयपीएल 2023 चा हंगाम संपला. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने गुजरात टायटन्सचा (GT) पाच गडी राखून पराभव करुन स्पर्धा जिंकली.
Ruturaj Gaikwad
Ruturaj GaikwadDainik Gomantak

Tata Tiago EV in IPL: आयपीएल 2023 चा हंगाम संपला. अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने गुजरात टायटन्सचा (GT) पाच गडी राखून पराभव करुन स्पर्धा जिंकली. आयपीएल दरम्यान प्रसिद्धीच्या झोतात आलेली कार म्हणजे टाटा टियागो ईव्ही.

टाटा मोटर्सकडे यंदाच्या आयपीएल सीझनचे अधिकृत प्रायोजकत्व होते. स्टेडियममध्ये प्रदर्शित केलेल्या Tiago EV ला जितक्या वेळ चेंडू लागला तितक्या वेळा 5 लाख रुपये देण्यात आले.

सीझनमध्ये दोनदा चेंडू टाटा टियागो ईव्हीला चेंडू लागला. याचा सरळ अर्थ असा आहे की, कंपनीला 10 लाख रुपये द्यावे लागले. कर्नाटकातील कॉफीच्या बागांची जैवविविधता वाढवण्यासाठी ही रक्कम दिली जाणार आहे.

ही घटना कधी घडली?

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यातील सामन्यादरम्यान ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) मारलेला चेंडू पहिल्यांदा Tiago EV लागला.

त्याचवेळी, मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यादरम्यान नेहल वढेराने मारलेला चेंडू थेट टाटा टियागोवर विजेच्या गतीने आदळला होता. ही दुसरी घटना होती.

Ruturaj Gaikwad
IPL 2023: रात्री 3.30 वाजता... एकिकडे CSK टीम जल्लोष करत होती, तर दुसरीकडे धोनी मात्र चाहत्यांना...

250 किमी. ची ड्राइविंग रेंज 

Tata Motors ने Tata Tiago EV भारतीय कार बाजारात दोन बॅटरी पॅक पर्यायांसह लॉन्च केली आहे. लहान पॅक 19.2 kWh आहे, ज्याची ड्रायव्हिंग रेंज 250 किमी आहे, तर मोठा पॅक 24 kWh आहे, ज्याची ड्रायव्हिंग रेंज 315 किमी आहे.

ही इलेक्ट्रिक कार चार प्रकारांमध्ये उपलब्ध असेल - XE, XT, XZ+ आणि XZ+ लक्स. Tata Tiago EV ही भारतातील (India) सर्वात जलद विक्री होणारी इलेक्ट्रिक कार बनली आहे, ज्याने डिसेंबर 2022 पर्यंत केवळ 24 तासांत 10,000 बुकिंग आणि 20,000 बुकिंग प्राप्त केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com