‘खेलो इंडिया’ अपयशाची गंभीर दखल

जून महिनाअखेरीस आढावा बैठक, पुढील स्पर्धेची तयारी आतापासूनच : क्रीडामंत्री गावडे
Govind Gaude
Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : आपण राज्याचे क्रीडामंत्रिपद स्वीकारल्यानंतर हरियानात झालेली खेलो इंडिया यूथ गेम्स पहिलीच मोठी स्पर्धा होती. गोव्याची स्पर्धेतील कामगिरी निराशाजनक ठरली. या अपयशाची गंभीर दखल घेण्यात आली असून यासंदर्भात जून महिनाअखेरीस आढावा बैठक घेण्यात येईल, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी शुक्रवारी दिली.

Govind Gaude
इंग्लंडने रचला इतिहास, वनडे क्रिकेटमध्ये उभारली सर्वात मोठी धावसंख्या

गोव्याला खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये योगासनात दोन सुवर्ण व एक रौप्य मिळून एकूण तीन पदके मिळाली. मात्र इतर खेळात एकही पदक जिंकता आले नाही. याविषयी क्रीडामंत्री गावडे म्हणाले, ‘‘महत्त्वाच्या खेळात गोव्याचे क्रीडापटू कमजोर ठरले. बॉक्सिंग व जलतरणात एक-दोन पदके थोडक्यात हुकली. हे अपवाद वगळता, खेळाडू अपेक्षांना जागू शकले नाहीत. कामगिरी का ढेपाळली याचा आढावा घेण्यासाठी या महिनाअखेरीस बैठक घेण्यात येतील. त्यावेळी सखोल चर्चा होईल. अवघ्या काही दिवसांच्या तयारीने राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या स्पर्धेत पदके जिंकता येत नाहीत.’’

क्रीडा प्रशिक्षकांकडून निराशा

क्रीडामंत्री गावडे यांनी खेलो इंडिया स्पर्धेतील कमजोर कामगिरीचे खापर प्रशिक्षकांवरही फोडले. ते म्हणाले, ‘‘पदक जिंकण्यासाठी पुरेसा सराव हवा. मार्गदर्शनाची बाजू महत्त्वाची आहे. गोव्याच्या प्रशिक्षकांकडून अधिक भरीव योगदान आणि एकाग्रता अपेक्षित आहे. यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होतील.’’ पुढील स्पर्धेची तयारी आतापासूनच सुरू करणे गरजेची आहे. त्यासाठी योग्य प्रशिक्षण अत्यावश्यक आहे, पुढील स्पर्धेपूर्वी त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न होतील, असे क्रीडामंत्री म्हणाले.

Govind Gaude
बांगलादेशच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, '145 वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये...'

साधनसुविधांकडे दुर्लक्षाबाबत खंत

राज्यात उपलब्ध असलेल्या क्रीडा साधनसुविधांनी योग्य तऱ्हेने निगराणी होत नाही, त्याबद्दल क्रीडामंत्री गावडे यांनी खंत व्यक्त केली. गोमंतकीय क्रीडापटूंच्या विकासात संबंधित क्रीडा संघटनांची भूमिकाही निर्णायक आहे, त्यांच्यात समन्वय आवश्यक आहे, असे ते म्हणाले. निव्वळ गुणवत्ता आणि योग्यतेवर खेळाडूंची निवड झाल्यास चित्र वेगळेच दिसेल, असा विश्वासही क्रीडामंत्र्यांनी व्यक्त केला.

‘‘क्रीडा व युवा व्यवहार खाते आणि गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्यात समन्वय नाही. फार मोठा अहंकार पाहायला मिळतो. मनमानी कारभार आहे. हे सारे बदलण्याची पाऊले टाकली जात आहेत.’’

- गोविंद गावडे, क्रीडामंत्री

गोव्याची कमजोर मोहीम

- यावेळच्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये 11 क्रीडाप्रकारांत 63 क्रीडापटू

- योगासनात 2 सुवर्ण, 1 रौप्य मिळून एकूण 3 पदके

- बॉक्सिंगमध्ये तिघे खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत गारद

- जलतरणातील दोन शर्यतीत संजना प्रभुगावकर चौथी

- मल्लखांबमध्ये गोव्याला सहावा क्रमांक

- तिरंदाजी, बॅडमिंटन, ज्युडो, नेमबाजी, जिम्नॅस्टिक्स, वेटलिफ्टिंग खेळात सहभाग नाममात्र

- राज्य खेळ फुटबॉलमध्ये सपशेल अपयश, संघाचे साखळी फेरीतच आव्हान आटोपले

यापूर्वी पदकांची संख्या जास्त

- 2018 मध्ये 1 सुवर्ण, 5 रौप्य, 2 ब्राँझसह 8 पदके

- 2019 मध्ये 8 रौप्य व 8 ब्राँझसह 16 पदके

- 2020 मध्ये 3 रौप्य व 9 ब्राँझ मिळून 12 पदके

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com