इंग्लंडने रचला इतिहास, वनडे क्रिकेटमध्ये उभारली सर्वात मोठी धावसंख्या

इंग्लंड आणि नेदरलँड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी खेळवला जात आहे.
Jos Buttler
Jos ButtlerDainik Gomantak
Published on
Updated on

ENG Vs NED: इंग्लंड आणि नेदरलँड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी खेळवला जात आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या केली आहे. (eng vs ned england end their innings on 498-4 the highest team total in mens odi history)

दरम्यान, इंग्लंडकडून (England) या सामन्यात तीन फलंदाजांनी शतके झळकावली. नाणेफेक जिंकून नेदरलँड्सने इंग्लंडला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि इंग्लिश फलंदाजांनी नेदरलँड्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या सामन्यात इंग्लंडने 4 गड्यांच्या मोबदल्यात 498 धावा केल्या होत्या. वनडे क्रिकेटच्या (ODI Cricket) इतिहासातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

Jos Buttler
ENG vs NZ 2nd Test Day 2: डॅरिल मिशेलने बॅक टू बॅक ठोकली सेंच्युरी

यापूर्वी, वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्येचा विक्रमही इंग्लंडच्या नावावर होता, ज्याने 19 जून 2018 रोजी नॉटिंगहॅममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) 6 बाद 481 धावा केल्या होत्या. इंग्लंडने आता नेदरलँड्सविरुद्ध (Netherlands) 498 धावा करुन आपलाच विक्रम मोडला आहे.

Jos Buttler
IND W VS ENG W: झुलन गोस्वामीचा करिष्मा, आणखी एका 'वर्ल्ड रिकॉर्ड' ला घातली गवसणी

दुसरीकडे, नेदरलँड्सविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर फिलिप सॉल्टने केवळ 93 चेंडूत 122 धावा केल्या. त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचवेळी डेव्हिड मलानने 109 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 125 धावा केल्या, तर यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरनेही (Jos Buttler) या सामन्यात शतक झळकावले. बटलरने 70 चेंडूंत 7 चौकार आणि 14 षटकारांच्या मदतीने 162 धावांची नाबाद खेळी खेळली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com