वाळपईत पावसाच्या सरी, हवामान विभागाने सकाळीच वर्तवला होता अंदाज

एक-दोन अंशांनी तापमानात वाढ होण्याची शक्यता
 Rain showers in valpoi The forecast was made by the meteorological department this morning
Rain showers in valpoi The forecast was made by the meteorological department this morningDainik Gomantak
Published on
Updated on

गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानात घट झाली असली तरी उकाडा वाढल्यामुळे लोक त्रस्त झाले आहेत. काल पणजी येथे कमाल 33.5 अंश तर किमान 25.6 अंश तापमानाची नोंद झाली, तर मडगाव (Margao) येथे किमान 33.8 अंश तर किमान 26.3 अंश एवढ्या तापमानाची नोंद झाली. पुढील तीन दिवस तापमानात कोणतेही मोठे बदल होणार नाहीत. त्यानंतर एक-दोन अंशांनी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच आज आणि उद्या राज्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तविली होती. दरम्यान, वाळपईत (valpoi) पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे.

 Rain showers in valpoi The forecast was made by the meteorological department this morning
31 मार्चपूर्वी 'ही' 5 कामे कोणत्याही परिस्थितीत करा पूर्ण, अन्यथा...

त्यानंतर राज्यात हळूहळू तापमान कमी होण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे. चालू आठवड्यात 21 आणि 22 मार्च रोजी हवामान खात्याने राज्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान महाराष्ट्रात (Maharashtra) जवळपास सर्वच ठिकाणी कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. पण येणाऱ्या उष्णतेच्या लाटेमुळे तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना दिवसभर उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com