ISL football: केरळा ब्लास्टर्सची धडाकेबाज सुरवात

‘सुपर सब’ इव्हान कलियूझ्नीचे दोन गोल
ISL football
ISL footballDainik Gomantak

कोची: बदली खेळाडू (सुपर सब) इव्हान कलियूझ्नी याने सात मिनिटांच्या अंतरात नोंदविलेल्या दोन गोलच्या बळावर इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात गतउपविजेत्या केरळा ब्लास्टर्सने विजयी सुरवात केली. येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर त्यांनी ईस्ट बंगालवर 3-1 फरकाने मात केली.

(Kerala Blasters start winning in the Indian Super League football tournament 2022)

ISL football
36 National Sports Tournament: जलतरणपटू श्रृंगी बांदेकरला ब्राँझपदक

सामन्यातील सर्व गोल शेवटच्या पंधरा मिनिटांच्या खेळात झाले. त्यापूर्वी ईस्ट बंगालचा गोलरक्षक कमलजीत सिंग याने केरळा ब्लास्टर्सची आक्रमणे रोखून धरली होती. उरुग्वेयन खेळाडू ॲड्रियन लुना याने 72 व्या मिनिटात ईस्ट बंगालला आघाडी मिळवून दिली. युक्रेनचा इव्हान कलियूझ्नी 79 व्या मिनिटास मैदानात उतरला. त्याने 82 व्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सने 2-0 अशी आघाडी घेतली.

ISL football
Goa Captain of Ports Department: बेकायदेशीर रेती उपसाविरोधात कारवाई तीव्र

88 व्या मिनिटास ब्राझीलियन ॲलेक्स लिमा याने ईस्ट बंगालची पिछाडी 1-2 अशी कमी केली, मात्र 89 व्या मिनिटास इव्हानने आणखी एक गोल नोंदवत तीन वेळच्या उपविजेत्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

बंगळूर-नॉर्थईस्ट लढत आज

आयएसएल स्पर्धेत शनिवारी (ता. 8) बंगळूर येथे यजमान बंगळूर एफसी व नॉर्थईस्ट युनायटेड यांच्यात सामना होईल. सामना कांतीरावा स्टेडियमवर खेळला जाईल. बंगळूरचा संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून गतमहिन्यात त्यांनी ड्युरँड कप स्पर्धा जिंकली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com