36 National Sports Tournament: जलतरणपटू श्रृंगी बांदेकरला ब्राँझपदक

गोव्याच्या खात्यात एकूण दोन ब्राँझपदके
Shringi Bandekar
Shringi Bandekar DAinik gomantak

पणजी: गोव्याची प्रमुख महिला जलतरणपटू श्रृंगी बांदेकर हिने गुजरातमधील 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी ब्राँझपदक जिंकले. सहभागी पाचही प्रकारांमध्ये अंतिम फेरी गाठलेल्या श्रृंगीने स्पर्धेतील पदकाची स्वप्नपूर्ती करत गोव्याला पदकतक्त्यात दुसरे पदक मिळवून दिले.

(36 National Sports Tournament swimmer Shringi Bandekar won Bronze medal)

Shringi Bandekar
Goa Captain of Ports Department: बेकायदेशीर रेती उपसाविरोधात कारवाई तीव्र

म्हापसा येथील, पण आता बंगळूर येथे सराव करणाऱ्या 19 वर्षीय श्रृंगीने महिलांच्या 200 मीटर मेडली प्रकारात तिसरा क्रमांक मिळवला. तिने 2 मिनिटे 28.64 सेकंद वेळ नोंदविली. या शर्यतीत पहिले दोन्ही क्रमांक कर्नाटकच्या जलतरणपटूस मिळाले. सुवर्ण विजेत्या हशिका रामचंद्र हिने 2 मिनिटे 26.23 सेकंद, तर रौप्य विजेत्या मनवी वर्मा हिने 2 मिनिटे 27.13 सेकंद वेळ नोंदविली.

Shringi Bandekar
Goa Shipyard: गोवा शिपयार्डकडून नियमांचे उल्लघन सुरूच - नंदादीप राऊत

गुजरातमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्यासाठी पुरुष जिम्नॅस्ट अभिजित निंबाळकर याने अन्य एक ब्राँझपदक यापूर्वी जिंकले होते. गोव्याच्या खाती आता स्पर्धेत एकूण दोन ब्राँझपदके जमा झाली आहेत. शुक्रवारी जलतरणातील 50 मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत गोव्याची संजना प्रभुगावकर 31.45 सेकंद वेळेसह चौथी आली, त्यामुळे तिला ब्राँझपदक अगदी थोडक्यात हुकले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com