New CBI director: भारताच्या 'या' क्रिकेटरचे सासरे आता नवे CBI डायरेक्टर, मुलीबरोबर 7 वर्षे होते अफेअर

सीबीआयचे नवे डायरेक्टर म्हणून प्रवीण सूद यांची नियुक्ती करण्यात आली असून ते एका स्टार क्रिकेटरचे सासरे आहेत.
Praveen Sood
Praveen SoodTwitter

New CBI director: भारतीय क्रिकेटपटू नेहमीच मैदानातील कामगिरीबरोबर मैदानाबाहेरी त्यांच्या वैयक्तिक कामगिरीमुळेही अनेकदा चर्चेत असतात. सध्या अशाच एका कारणामुळे मयंक अगरवालही चर्चेत आहे. पण या चर्चेचे कारण आनंदादायी आहे.

मयंक अगरवालचे सासरे प्रवीण सूद सेंट्रल ब्युरो ऑफ इनव्हिस्टिगेशनचे (CBI) नवीन संचालक बनले आहेत. ते याआधी कर्नाटकचे पोलीस महासंचालक (DGP) म्हणून काम पाहात होते. पण रविवारी त्यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची पुढील २ वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रवीण सूद 25 मे रोजी सुबोध कुमार जयस्वाल यांचा कार्यकाळ संपल्यानंतर सीबीआयचे संचालक म्हणून पदभार संभाळतील.

Praveen Sood
Jiah Khan Suicide Case Verdict: सुरज पांचोली निर्दोष मुक्त...CBI न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, जियाची आई राबिया खान हायकोर्टात जाणार

साल 1964 साली जन्मलेल्या सूद यांनी आयआयटी दिल्लीमधून शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर ते 1986 साली भारतीय पोलीस सेवेत रुजू झाले. त्यांनी 1989 मध्ये म्हैसुरला सहाय्यक पोलीस अधिक्षक म्हणून काम पाहायला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी बेलरी आणि रायचूरमध्ये पोलीस अधिक्षक म्हणूनही काम पाहिले.

1986 मध्ये भारतीय पोलीस सेवेत (IPS) रुजू झाले. सहाय्यक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. 1989 मध्ये म्हैसूरचे पोलीस अधीक्षक, बेंगळुरू शहरात पोलीस उपायुक्त, कायदा व सुव्यवस्था म्हणून नियुक्त होण्यापूर्वी त्यांनी बेल्लारी आणि रायचूरचे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. त्यांनंतर त्यांची बंगळुरू शहरात कायदा आणि सुव्यवस्था व पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता ते सीबीआय संचालक म्हणून काम पाहाणार आहेत.

Praveen Sood
CBI Action on Sameer Wankhede: समीर वानखेडे यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या, सीबीआयने नोंदवला भ्रष्टाचाराचा गुन्हा!

सूद यांच्या मुलीचे होते मयंकबरोबर अफेअर

प्रवीण सूद यांची मुलगी अशिता सूद हिचे 2018 मध्ये मयंकबरोबर लग्न झाले आहे. अशिता आणि मयंक लग्नाआधी जवळपास 7 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मयंकने जानेवारी 2018 मध्ये अशिताला टेम्स नदी किनारी रोमँटिक अंदाजात प्रपोजही केले होते. त्यांनतर त्या दोघांनी दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने जूनमध्ये लग्न केले. आता मयंक आणि अशिता यांना एक मुलगा देखील आहे.

मयंक करतोय संघर्ष

कर्नाटककडून गेल्या हंगामात देशांतर्गत स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा मयंक आयपीएल 2023 स्पर्धेत मात्र संघर्ष करताना दिसत आहे. या हंगामात तो सनरायझर्स हैदराबादकडून खेळत असून त्याने आत्तापर्यंत 9 सामने खेळले असून 20.78 च्या सरासरीने केवळ 187 धावाच केल्या आहेत. त्याला गेल्या काही सामन्यातून संघातून वगळण्यातही आले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com