T20 International New World Record: T20 इंटरनॅशनलमध्ये 'या' खेळाडूने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड! पहिल्यांदाच 7 विकेट घेत...

T20 International New World Record: मलेशियाचा धडाकेबाज गोलंदाज सयाजरुल इद्रस बुधवारी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सात विकेट्स (7/8) घेणारा पहिला खेळाडू ठरला.
Syazrul Idrus
Syazrul Idrus Dainik Gomantak
Published on
Updated on

T20 International New World Record: मलेशियाचा धडाकेबाज गोलंदाज सयाजरुल इद्रस बुधवारी T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सात विकेट्स (7/8) घेणारा पहिला खेळाडू ठरला. आयसीसी मेन्स T20 विश्वचषक 2024 च्या आशिया क्षेत्रीय क्वालीफायर B टूर्नामेंटच्या उद्घाटन सामन्यात इद्रसने ही कामगिरी केली. इद्रसने चीनविरुद्ध ही शानदार कामगिरी केली.

आंतरराष्ट्रीय T20 मध्ये मोठा विश्वविक्रम

दरम्यान, सयाजरुल इद्रस याने पीटर अहोचा विक्रम मोडला. नायजेरियाकडून खेळताना पीटर अहोने 2021 मध्ये सिएरा लिओनविरुद्ध 5 धावांत 6 बळी घेतले होते.

Syazrul Idrus
World Cup 2023: भारत-पाकिस्तान यांच्यातील हाय व्होलेटेज सामन्याची तारीख बदलणार! 'ही' मोठी अपडेट आली समोर

पहिल्यांदाच एका गोलंदाजाने 7 विकेट घेतल्या

विशेष म्हणजे, याआधी पुरुषांच्या T20 मध्ये एकूण 12 गोलंदाजांनी सहा विकेट घेतल्या आहेत – यात भारताचा दीपक चहर आणि यजुवेंद्र चहल, ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅश्टन एगर आणि श्रीलंकेचा अजंथा मेंडिस यांचा समावेश आहे –

परंतु इद्रसच्या अप्रतिम प्रयत्नापर्यंत सात विकेट्स घेण्याचा विक्रम कधीही नोंदवला गेला नाही. इद्रसच्या गोलंदाजीच्या जोरावर मलेशियाने चीनवर (China) आठ गडी राखून दणदणीत विजय नोंदवला.

Syazrul Idrus
Asia Cup 2023: भारत - पाकिस्तान 'या' दिवशी लढणार? तारिख अन् ठिकाणाबद्दल आली मोठी अपडेट

चीनच्या फलंदाजीची फळी उद्ध्वस्त केली

दुसरीकडे, उजव्या हाताच्या या गोलंदाजाने चायनीज बॅटिंग लाइनअप उद्धवस्त केली, 12 व्या षटकापर्यंत पाहुण्या संघाच्या अवघ्या 23 धावा होत्या. प्रत्युत्तरात मलेशियाने दोन झटपट गडी गमावले आणि विजयी लक्ष्य पाचव्या षटकात गाठले, ज्यामुळे पुढील वर्षी यूएसए आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी पात्रता स्पर्धेला शानदार सुरुवात झाली.

या स्पर्धेतील विजेता नोव्हेंबरमध्ये नेपाळमध्ये (Nepal) आशिया विभागीय अंतिम फेरीत प्रवेश करेल, त्या स्पर्धेतील शीर्ष दोन संघ 2024 मध्ये 20 षटकांच्या अंतिम फेरीत पोहोचतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com