'विराटला आता अहंकार सोडून नव्या कर्णधाराला साथ द्यावी लागेल'

कोहलीचा (Virat Kohli) हा निर्णय खूपच आश्चर्यकारक ठरला. कोहली कसोटीचे कर्णधारपद सोडेल असे कोणालाच वाटत नव्हते.
Kapil Dev
Kapil DevDainik Gomantak
Published on
Updated on

विराट कोहलीने शनिवारी भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. कोहली हा केवळ भारतीय कसोटी संघाचा कर्णधार होता. परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर त्याने हे पद सोडले. मात्र, कोहलीचा हा निर्णय खूपच आश्चर्यकारक ठरला. कोहली (Virat Kohli) कसोटीचे कर्णधारपद सोडेल असे कोणालाच वाटत नव्हते.

मात्र कोहलीने सोशल मीडियावरुन (Social media) एक निवेदन जारी करुन ही धक्कादायक माहिती दिली. विराटच्या कर्णधारपद सोडण्याबाबत अनेक दिग्गज आपले मत मांडत आहेत. भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार कपिल देवही (Kapil Dev) या कोहलीच्या राजीनाम्यावर बोलले आहेत. 'विराट बराच काळ दबावात दिसत होता. कोहलीला अहंकार सोडून नव्या कर्णधाराच्या हाताखाली खेळावे लागेल असं कपिल देव यांनी म्हटले आहे.'

Kapil Dev
बीसीसीआयमध्ये 'शहजादा'चे राजकारण; कोहलीच्या राजीनाम्यावर मंत्री म्हणाले...

दरम्यान, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खेळल्या गेलेल्या ICC T20 विश्वचषकापूर्वीच (ICC T20 World Cup) कोहलीने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. यानंतर डिसेंबरमध्ये त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुनही हटवण्यात आले होते. कोहलीने त्याच्या आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे (Royal Challengers Bangalore) कर्णधारपदही सोडले होते. दरम्यान, दोन वर्षांपासून त्याने एकही शतक केलेले नाही.

विराटच्या निर्णयाचे स्वागत

रविवारी मिड-डे या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना कपिल देव म्हणाले, विराटच्या कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. जेव्हापासून त्याने टी-20 संघाचे कर्णधारपद सोडले, तेव्हापासून तो अत्यंत वाईट काळातून जात आहे. अलिकडच्या काळात तो चिंतेत दिसत आहे, हे पाहून तो खूप दबावाखाली असल्याचे प्रतित होते. त्यामुळे मोकळेपणाने खेळण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेता येईल. आणि त्याने तेच निवडले."

निर्णय घेण्यापूर्वी विचार करा

कपिल देव पुढे म्हणाले, एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी विराटने विचार केला असेल. देव पुढे म्हणाले, “तो एक सक्षम खेळाडू आहे. मला खात्री आहे की, हा निर्णय घेण्यापूर्वी त्याने विचार केला असेल. कदाचित त्याला कर्णधारपदाचा आनंद घेता नसेल. आपण त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि त्याला शुभेच्छाही दिल्या पाहिजेत.

Kapil Dev
सचिन तेंडुलकरला मिळू शकते बीसीसीआयमध्ये मोठी जाबाबदारी

अहंकार सोडला पाहिजे

विराटला अहंकार सोडून नव्या कर्णधाराच्या हाताखाली खेळावे लागेल, असेही कपिल देव यांनी मुलाखती दरम्यान सांगितले. कपिल पुढे म्हणाले, सुनील गावस्कर माझ्या हाताखाली खेळला. मी कृष्णमाचारी श्रीकांत आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नेतृत्वाखाली खेळलो. मला कधीच अहंकार नव्हता. विराटला आपला अहंकार सोडून युवा क्रिकेटपटूच्या हाताखाली खेळावे लागेल. त्यामुळे त्याला आणि भारतीय क्रिकेटला त्याची मदत होईल. विराटला नव्या कर्णधाराला मार्गदर्शन करावे लागणार आहे. एक फलंदाज म्हणून आम्ही विराटला गमावू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com