विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. विराटने हा निर्णय खूप विचारपूर्वक घेतला असेल परंतु त्याचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांसाठी आणि क्रिकेट जगताशी संबंधित अनेक खेळाडू आणि तज्ज्ञांना धक्का देणारा होता. विराटच्या या निर्णयावर अनेकांनी आपापल्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याची पत्नी अनुष्का शर्मानेही एक भावनिक पोस्ट केली आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही (Sachin Tendulkar) आपली प्रतिक्रिया दिली असून, रोहित शर्मानेही (Rohit Sharma) विराटच्या (Virat Kohli) या निर्णयाचा धक्का बसल्याचे ट्विट केले आहे. परंतु एक प्रतिक्रिया या सगळ्या विराटच्या या निर्णयाबाबत महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी बीसीसीआयच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बीसीसीआय सचिव जय शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.
नितीन राऊत यांनी ट्विट करुन आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले की, "जेव्हा भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहली राजीनामा देतो, तेव्हा समजून घ्या की क्रिकेट बोर्डाच्या 'शहजादा' चे राजकारण अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचले आहे. विराट मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) पडत्या काळात पाठीशी उभा होता.
बीसीसीआयने विराटच्या निर्णयाचा आदर करत राजीनामा स्वीकारला
बीसीसीआयने (BCCI) विराट कोहलीच्या निर्णयाचा आदर करत त्याचे अभिनंदन केले आहे. निवड समितीनेही त्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. विराटच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयने त्याच्या निर्णयाबाबत दिलेल्या अधिकृत निवेदनात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ आणि संयुक्त सचिव यांच्या नावाचा त्या पत्रावर समावेश आहे.
विराट कोहलीने सर्वप्रथम राहुल द्रविडचा प्रशिक्षक होण्याचा निर्णय सांगितला. यानंतर त्याने आपला निर्णय बीसीसीआयचे सचिव जय शाह यांना सांगितला. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनीही विराट कोहलीच्या निर्णयाचा आदर करत त्याचे कौतुक केले.पेक्षा वेगळी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.