T20 World Cup 2026: वर्ल्डकप विजयाचं स्वप्न धुळीस मिळणार? स्पर्धेपूर्वी नको तेच घडलं, स्टार खेळाडू बाहेर

Josh Hazlewood ruled out of T20 World Cup 2026: येत्या ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत रंगणाऱ्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ साठी सज्ज झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाला स्पर्धेच्या उंबरठ्यावर असतानाच एक मोठा धक्का बसला आहे.
Josh Hazlewood ruled out of T20 World Cup 2026
Josh Hazlewood ruled out of T20 World Cup 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

येत्या ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत रंगणाऱ्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ साठी सज्ज झालेल्या ऑस्ट्रेलियन संघाला स्पर्धेच्या उंबरठ्यावर असतानाच एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा अनुभवी आणि हुकुमी वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतीमुळे या महाकुंभातून बाहेर पडला आहे. पॅट कमिन्सपाठोपाठ आता हेजलवूडच्या एक्झिटमुळे कांगारूंच्या गोलंदाजीची धार पार बोथट झाली असून, मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ आता मोठ्या संकटात सापडला आहे.

जोश हेजलवूडला गेल्या नोव्हेंबरमध्ये 'शेफील्ड शील्ड' सामन्यादरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो सावरत असल्याचा विश्वास निवडकर्त्यांना होता, म्हणूनच त्याची विश्वचषकाच्या १५ सदस्यीय संघात निवड करण्यात आली होती.

मात्र, ऑस्ट्रेलियन संघ जेव्हा श्रीलंकेत दाखल झाला, तेव्हा हेजलवूड त्यांच्यासोबत नव्हता; तो सिडनीमध्येच राहून फिटनेसवर काम करत होता. अखेर कोलंबोमध्ये आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्याला फक्त ५ दिवस उरले असताना, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तो पूर्णपणे बाहेर झाल्याचे अधिकृतपणे जाहीर केले.

Josh Hazlewood ruled out of T20 World Cup 2026
Mhaji Bus Goa: ‘माझी बस’ योजनेत मोठे बदल! दिगंबर कामतांचे प्रतिपादन; योजनेला अल्प प्रतिसादामुळे चिंता केली व्यक्त

निवडकर्ते काय म्हणाले?

ऑस्ट्रेलियाचे मुख्य निवडकर्ते टोनी डोडेमाइड यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, "आम्हाला आशा होती की जोश 'सुपर-८' फेरीपर्यंत मॅच-फिट होईल. परंतु ताज्या अहवालांनुसार त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी अजून बराच वेळ हवा आहे. अशा परिस्थितीत त्याच्या पुनरागमनासाठी घाई करणे अत्यंत जोखमीचे ठरू शकते." विशेष म्हणजे, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सध्या हेजलवूडच्या जागी कोणत्याही पर्यायी खेळाडूची घोषणा केलेली नाही. सुरुवातीच्या सामन्यांसाठी आमच्याकडे पुरेसे पर्याय उपलब्ध असल्याचे डोडेमाइड यांनी स्पष्ट केले आहे.

Josh Hazlewood ruled out of T20 World Cup 2026
Goa Crime: मोठी कारवाई! म्हापशात 65 लाखांचे ड्रग्स, कुडचडेत 9 लाखांचा गांजा जप्त; मजुरांचे बिहार कनेक्शन उघड

या विश्वचषकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, तब्बल १५ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघ आपली प्रसिद्ध 'बिग थ्री' (कमिन्स, स्टार्क आणि हेजलवूड) जोडीशिवाय मैदानात उतरणार आहे. मिचेल स्टार्कने आधीच निवृत्ती घेतली आहे, तर कमिन्स आणि हेजलवूड दुखापतीमुळे बाहेर आहेत. आता ऑस्ट्रेलियाची मदार बेन ड्वार्शियस आणि जेवियर बार्टलेट यांसारख्या अननुभवी पण प्रतिभावान गोलंदाजांवर असेल. श्रीलंकेतील फिरकीला पोषक खेळपट्ट्यांवर ॲडम झॅम्पा आणि मॅथ्यू कुहनेमॅन यांची भूमिका आता अधिक महत्त्वाची ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com