साऊथच्या चित्रपटांनी मला वाईट हिंदी चित्रपटांपासून वाचवले: सोनू सूद

सोनूने सांगितले की, दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केल्याने तो वाईट हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यापासून दूर राहतो.
Sonu Sood
Sonu SoodDainik Gomantak

हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त सोनू सूद साऊथ चित्रपटांमध्येही काम करतो. सोनूने आपल्या करिअरची सुरुवात तामिळ चित्रपटातून केली आणि त्यानंतर त्याने तेलुगू चित्रपटात काम केले. यानंतर सोनूने हिंदी चित्रपटांतून करिअरला सुरुवात केली. 2002 मध्ये सोनूने शहीद-ए-आझम सोबत हिंदी चित्रपटांमध्ये एंट्री घेतली.

Sonu Sood
जूनमध्ये इतके दिवस बँकांना असेल सुट्टी; जाणून घ्या

सध्या सोनूचे अनेक चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत, ज्यात हिंदी आणि दक्षिणेकडील चित्रपटांचा समावेश आहे. दरम्यान, आता सोनूने हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांबाबत वक्तव्य केले असून ते व्हायरल होत आहे. सोनूने सांगितले की, दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केल्याने तो वाईट हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्यापासून दूर राहतो.

सोनू म्हणाला, 'मी तामिळ, तेलुगू किंवा हिंदी चित्रपट करत असलो तरी माझ्या स्क्रिप्ट्सबद्दल मी नेहमीच निवडक असतो. साऊथचे चित्रपट मला वाईट हिंदी चित्रपट करण्यापासून वाचवतात. नाहीतर एक टप्पा येतो जेव्हा तुम्हाला फक्त मोठ्या चित्रपटात काम करायचे असते. त्यामुळे साऊथचे चित्रपट मला यापासून दूर ठेवतात.

सोनू अलीकडेच तेलुगु चित्रपट आचार्यमध्ये दिसला होता. या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत होता. या चित्रपटात सोनूसोबत चिरंजीवी आणि राम चरण मुख्य भूमिकेत होते. आता सोनू पृथ्वीराज या चित्रपटात दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com