World Cup 2023: जोस बटलरच्या वक्तव्याने गोंधळ, धरमशाला स्टेडियमच्या आऊटफिल्डबाबत म्हणाला...

ENG vs BAN: एकदिवसीय विश्वचषक 2023 ची सुरुवात झाली आहे. गतविजेता इंग्लंड मंगळवारी (10 ऑक्टोबर) बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
Dharamshala Stadium
Dharamshala StadiumDainik Gomantak
Published on
Updated on

ENG vs BAN: एकदिवसीय विश्वचषक 2023 ची सुरुवात झाली आहे. गतविजेता इंग्लंड मंगळवारी (10 ऑक्टोबर) बांगलादेशविरुद्ध मैदानात उतरणार आहे. इंग्लंडविरुद्ध बांगलादेशचा हा सामना धरमशाला स्टेडियमवर होणार आहे.

मात्र, सामन्यापूर्वी धरमशालाच्या खेळपट्टीवरुन वाद सुरु झाला आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने धरमशाला स्टेडियमच्या आउटफिल्डवर प्रश्न उपस्थित केला आहे.

बटलरने सांगितले की, त्याच्या मते धरमशाला मैदानाचे आऊटफिल्ड खराब आहे. आम्हाला मैदानावर डाइव्ह दरम्यान खबरदारी घेण्यास सांगितले आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या देशासाठी खेळता तेव्हा तुम्हाला असे काहीही वाटत नाही. प्रत्येक धाव वाचवण्यासाठी तुम्ही क्षेत्ररक्षणात सर्वकाही देता. मात्र धरमशालेच्या मैदानाचे आऊटफिल्ड हवे तेवढे चांगले नाही.

Dharamshala Stadium
World Cup 2023: शुभमन गिल दुसऱ्या सामन्यात खेळणार की नाही? BCCI कडूनच मिळाले महत्त्वाचे अपडेट्स

अफगाणिस्तान-बांगलादेश सामन्यातही गदारोळ झाला

बांगलादेश (Bangladesh) आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यानही धरमशाला मैदानाच्या आऊटफिल्डवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्या सामन्यात मुजीब झद्रानने डाईव्ह घेतला तेव्हा, मैदानावरील गवत पूर्णपणे उखडले होते.

अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकाने तर मुजीब नशीबवान असल्याचे म्हटले होते. धरमशाला मैदानाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले, तेव्हापासून त्याच्या आउटफिल्डवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. धरमशालेचे आऊटफील्ड खूप मऊ असल्याचे सांगितले जाते.

Dharamshala Stadium
World Cup 2023: पहिले पाढे पंचावन्न! टीम इंडियाने 2 धावांत 3 विकेट्स गमावल्यानंतर मीम्सचा महापूर

खेळाडूला दुखापत झाल्यास काय होणार?

धरमशालेच्या मैदानावर क्षेत्ररक्षण करताना खेळाडूला दुखापत झाल्यास काय होईल, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. एका खेळाडूला दुखापत झाल्यास त्या संघाची विश्वचषक जिंकण्याची शक्यता कमी होऊ शकते.

टीम इंडियाला (Team India) धरमशालामध्येही एक सामना खेळायचा आहे. हा सामना 3 ऑक्टोबरला होणार आहे. या मैदानाच्या आऊटफिल्डवर टीम इंडिया काय प्रतिक्रिया देते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com