IND vs ENG: फक्त 'इतकं' करा आणि 2 विक्रम मोडा! ओव्हलमध्ये घडणार मोठा करिष्मा; भारत-इंग्लंड मिळून मोडणार 70 वर्ष जुना वर्ल्ड रेकॉर्ड

Test Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची मालिका आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे.
Test Record
Test RecordDainik Gomantak
Published on
Updated on

Test Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची मालिका आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. 20 जून रोजी सुरु झालेली ही मालिका एका महिन्याहून अधिक काळानंतर आता अंतिम वळणावर आली आहे. चार सामने खेळले गेले असून, यात इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, मालिकेतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना 31 जुलैपासून लंडनच्या केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval, London) येथे खेळला जाईल. या सामन्यात भारताला मालिका बरोबरीत आणण्याची संधी असेल, तर इंग्लंड (England) विजयाने ट्रॉफीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करेल. मात्र, या निर्णायक सामन्यात केवळ मालिकाच नाहीतर दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सही (World Records) पणाला लागले आहेत, आणि ते मोडण्यासाठी दोन्ही संघांना फारशी मेहनत घ्यावी लागणार नाही असे दिसते.

Test Record
IND vs ENG: सर जडेजा पुन्हा रचणार इतिहास! व्हीव्हीएस लक्ष्मणचा रेकॉर्ड निशाण्यावर; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

आतापर्यंत 18 शतके, 70 वर्षांचा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर

दुसरीकडे, या मालिकेत आतापर्यंत दोन्ही संघांच्या फलंदाजांनी मिळून एकूण 18 शतके (Centuries) झळकावली आहेत. जर ओव्हल टेस्टमध्ये आणखी 4 शतके लागली, तर एक 70 वर्षांचा जुना वर्ल्ड रेकॉर्ड (70-year-old World Record) मोडला जाईल. हा विक्रम 1955 मध्ये ऑस्ट्रेलिया (Australia) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात खेळल्या गेलेल्या मालिकेत बनला होता, जिथे एकूण 21 शतके पाहायला मिळाली होती. सध्याच्या मालिकेत 18 शतके आधीच झाली आहेत, आणि ओव्हल टेस्टमध्ये फलंदाजांचा फॉर्म पाहता हा आकडा पार करणे फारसे कठीण वाटत नाही.

12 वेगवेगळ्या फलंदाजांनी शतक झळकावली

या मालिकेत आतापर्यंत 12 वेगवेगळ्या फलंदाजांनी (12 Different Batsmen) शतके झळकावली आहेत. भारत (India) आणि इंग्लंड दोन्ही संघांतील प्रत्येकी 6-6 फलंदाजांनी शतक केले आहे. हा देखील एक साझा वर्ल्ड रेकॉर्ड (Shared World Record) आहे, कारण आतापर्यंत कोणत्याही एका कसोटी मालिकेत सर्वाधिक 12 फलंदाजांनीच शतके केली आहेत. जर ओव्हल टेस्टमध्ये असा एखादा खेळाडू शतक झळकावतो, ज्याने या मालिकेत अजून शतक केलेले नाही, तर हा विक्रम मोडला जाईल आणि नवा इतिहास रचला जाईल.

Test Record
IND vs ENG: मँचेस्टर कसोटी अनिर्णित, पण टीम इंडियाच्या नावावर लज्जास्पद विक्रम; 90 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

भारत विरुद्ध इंग्लंड 2025 मालिकेत आतापर्यंतची शतके:

  • शुभमन गिल (Shubman Gill) – 4 शतके

  • केएल राहुल (KL Rahul) – 2 शतके

  • ऋषभ पंत (Rishabh Pant) – 2 शतके

  • रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) – 1 शतक

  • यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) – 1 शतक

  • वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) – 1 शतक

  • जेमी स्मिथ (Jamie Smith) – 1 शतक

  • जो रूट (Joe Root) – 1 शतक

  • बेन डकेट (Ben Duckett) – 1 शतक

  • हॅरी ब्रूक (Harry Brook) – 1 शतक

  • बेन स्टोक्स (Ben Stokes) – 1 शतक

  • ओली पोप (Ollie Pope) – 1 शतक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com