Jhulan Goswami: महिला आयपीएलसाठी झुलन होणार मुंबईकर! 'ही' मोठी जबाबदारी खांद्यावर

झुलन गोस्वामी WPL 2023 हंगामात मुंबई संघासाठी महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.
Jhulan Goswami
Jhulan GoswamiDainik Gomantak
Published on
Updated on

WPL 2023: भारतीय क्रिकेटमध्ये यावेळी पहिल्यांदाच महिला आयपीएल म्हणजेच वुमेन प्रीमियर लीग (WPL) खेळवण्यात येणार आहे. यासाठी 5 संघही निश्चित झाले असून त्यांनी पहिल्या डब्ल्यूपीएल हंगामाची तयारीही सुरू केली आहे. दरम्यान, या हंगामासाठी दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामी गोलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शन म्हणून मुंबई फ्रँचायझीशी जोडली गेली आहे.

झुलनला दिल्ली फ्रँचायझीनेही ऑफर देऊ केली होती. मात्र, तिने मुंबई फ्रँचायझीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने माहिती दिली आहे. गांगुली दिल्ली कॅपिटल्स संघाचा संचालक म्हणून आयपीएल 2023 मध्ये दिसणार आहे.

Jhulan Goswami
WPL 2023: ठरलं तर! मिताली दिसणार महिला आयपीएलमध्ये, 'या' संघाने दिली मोठी संधी

डब्लूपीएलसाठी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, अहमदाबाद आणि लखनऊ हे पाच संघ निश्चित झाले आहेत. यातील दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरु हे संघ आयपीएल संघांच्या मालकांनीच विकत घेतले आहेत. तर अहमदाबाद फ्रँचायझी अदानी ग्रुपने आणि केप्री ग्लोबल होल्डिंग्स प्रायव्हेट लिमिटेडने लखनऊ फ्रँचायझी विकत घेतली आहे.

दरम्यान, इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार गांगुलीने सांगितले आहे की दिल्लीने झुलनला संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील करण्याचा विचार केला होता. मात्र ती मुंबई संघात सामील झाली आहे.

मात्र, अद्याप मुंबई फ्रँचायझीकडून झुलनबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मुंबई फ्रँचायझीचा मालकी हक्क मुंबई इंडियन्स ग्रुपकडे आहे. मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघ आहे.

(Jhulan Goswami will join the Mumbai franchise for WPL 2023 as bowling coach and mentor)

Jhulan Goswami
WPL Teams: महिला IPL टीम जाहीर, आदानींचा ठरला सर्वात महागडा संघ; 4669.99 कोटींचे...!

40 वर्षीय झुलन गोस्वामी गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली आहे. तिने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 355 विकेट्स घेतल्या आहेत. ती सर्वाधिक विकेट्स घेणारी महिला क्रिकेटपटूही आहे.

दरम्यान, झुलनपूर्वी भारताची दिग्गज फलंदाज मिताली राज हिची अहमदाबाद फ्रँचायझीसाठी डब्ल्यूपीएल 2023 मध्ये मार्गदर्शक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आता भारताच्या दोन दिग्गज महिला खेळाडू यंदाच्या डब्ल्यूपीएल एका वेगळ्या भूमिकेत सर्वांना दिसणार आहेत.

डब्ल्यूपीएल 2023 साठी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात लिलाव होण्याची शक्यता आहे. तसेच मार्चमध्ये हा हंगाम खेळवला जाऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com