WWC 2022: झुलन गोस्वामीने रचला इतिहास, 1 विकेट घेत बनली नंबर वन गोलंदाज

भारतीय वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने (Jhulan Goswami) इतिहास रचला आहे.
Jhulan Goswami
Jhulan GoswamiDainik Gomantak
Published on
Updated on

भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने इतिहास रचला आहे. महिला क्रिकेट विश्वचषकात ती सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील सामन्यात झुलन गोस्वामीने (Jhulan Goswami) अनिसा मोहम्मदला बाद करत महिला विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली आहे. तिने वर्ल्ड कपमध्ये 40 विकेट घेतल्या आहेत. झुलनला वेस्ट इंडिजविरुद्ध फक्त एक विकेट मिळाली होती. पंरतु त्यामुळे हा विक्रम तिच्या नावावर झाला. झुलनने महिला विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या (Australia) लिन फुलस्टनला मागे टाकले आहे. जिने 39 बळी घेतले आहेत. फुलस्टनने 20 सामन्यात 39 विकेट घेतल्या होत्या. 31व्या विश्वचषक सामन्यात झुलनने तिचा हा विक्रम मोडला. (Jhulan Goswami has become the highest wicket taker in the Women's Cricket World Cup)

दरम्यान, महिला विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज इंग्लंडची कॅरोल हॉजेस आहे, जिने तिसर्‍या क्रमांकावर 37 बळी घेतले. तर इंग्लंडची क्लेअर टेलर 36 विकेट्ससह चौथ्या आणि ऑस्ट्रेलियाची कॅथरीन फिट्झपॅट्रिक 33 विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. सध्या भारताला विश्वचषक 2022 मध्ये आणखी किमान चार सामने खेळायचे आहेत.

Jhulan Goswami
Women’s World Cup 2022: भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिज चा रोखला 'विजयी रथ'

तसेच, 39 वर्षीय झुलन गोस्वामी ही महिला क्रिकेटमधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. जिने वनडे फॉरमॅटमधील 198 मॅचमध्ये 249 विकेट घेतल्या आहेत. या विश्वचषकात तिच्या गोलंदाजीने कमाल केली आहे. तिने तीन सामन्यांत चार विकेट घेतल्या आहेत.

Jhulan Goswami
ICC Womens World Cup 2022: स्मृती मंधाना अन् हरमनप्रीत कौर ने रचला इतिहास

शिवाय, झुलन गोस्वामी तिचा शेवटचा वर्ल्डकप खेळत आहे. या स्पर्धेनंतर ती निवृत्त होण्याची शक्यता आहे. झुलनने 2002 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सध्या ती भारतीय गोलंदाजांमध्ये प्रमुख आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com