Jasprit Bumrah: यशाला बाप हजार... जगातील अव्वल गोलंदाजाचा मान मिळल्यानंतर बुमराहची इन्स्टा पोस्ट व्हायरल

Jasprit Bumrah Instagram Post: कारकिर्दीत तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. या खास प्रसंगी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे जी व्हायरल होत आहे.
Jasprit Bumrah
Jasprit BumrahX/BCCI
Published on
Updated on

Jasprit Bumrah Instagram Story: जसप्रीत बुमराह हा भारताच्या सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. तो नुकताच आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर-1 गोलंदाज बनला आहे. त्याने आपलाच सहकारी आर अश्विनकडून नंबर-1चा मुकुट हिसकावून घेतला.

जसप्रीत बुमराह कसोटीत क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी त्याने एकदिवसीय आणि टी-20 मध्ये ही कामगिरी केली होती. कारकिर्दीत तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे. या खास प्रसंगी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे जी व्हायरल होत आहे.

कसोटीत नंबर-1 गोलंदाज बनल्यानंतर जसप्रीत बुमराहने इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये दोन फोटो दिसत आहेत. ज्यामध्ये एकात लोकांनी खचाखच भरलेले स्टेडियम आणि दुसऱ्यात फक्त एका समर्थकासह रिकामा स्टँड दिसतो.

या पोस्टद्वारे त्याने समर्थन करणाऱ्या आणि अभिनंदन करणाऱ्या लोकांची तुलना केली आहे. या फोटोमध्ये दिसते की जेव्हा पाठींबा द्यायचा असतो तेव्हा फक्त काही मोजकेच लोक पुढे येतात पण जेव्हा आपण यश मिळवतो तेव्हा अनेकजन अभिनंदनासाठी आणि यशाचे क्रेडिट घेण्यासाठी पुढे येतात.

Jasprit Bumrah
ICC Test Ranking: जसप्रीत बुमराह ठरला कसोटीतील नंबर 1 गोलंदाज; आर. अश्विनला सोडले मागे!

भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. जसप्रीत बुमराहने या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने दोन सामन्यांत 10.66 च्या सरासरीने 15 बळी घेतले आहेत.

विशाखापट्टणम येथे नुकत्याच झालेल्या कसोटी सामन्यात त्याने टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने 6 तर दुसऱ्या डावात 3 बळी घेतले. या चमकदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.

Jasprit Bumrah
ICC ODI Rankings मध्ये केएल राहुल आणि श्रेयस अय्यरला फायदा; बाबर आझम अव्वल स्थानी कायम!

ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत जसप्रीत बुमराह ८८१ रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर कागिसो रबाडा दुसऱ्या स्थानावर कायम आहे.

पण आर अश्विन पहिल्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचे रेटिंग गुण 841 आहेत. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका आर अश्विनसाठी आतापर्यंत काही खास राहिलेली नाही. त्याला 2 सामन्यांच्या 4 डावात फक्त 9 विकेट घेता आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com