Pranali Kodre
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने विशाखापट्टणम येथे भारताविरुद्ध 2 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू झालेल्या कसोटीत मोठा इतिहास रचला.
अँडरसनने सामन्यात शुभमन गिलला बाद करत 2024 वर्षातील पहिली कसोटी विकेट घेतली.
याबरोबरच अँडरसनने सलग 22 व्या वर्षी कसोटीत विकेट घेण्याचा कारनामा केला आहे.
अँडरसनने 2003 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.
अँडरसनने 2003 सालापासून 2024 सालापर्यंत प्रत्येक वर्षी कसोटीत किमान एक तरी विकेट घेतली आहे.
म्हणजेच अँडरसनने 2003, 2004, 2005, 2006, 2007, 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017, 2018, 2019, 2020, 2021, 2022, 2023 आणि 2024 अशा सलग 22 वर्षी किमान एक कसोटी विकेट घेतली आहे.
त्यामुळे तब्बल सलग 22 वर्षे कसोटीत विकेट घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.
41 वर्षीय अँडरसनने 180 पेक्षाही अधिक कसोटी सामने खेळले असून 690 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.