Jeff Thomson On Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहची गणना जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये केली जाते. त्याने भारतीय संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. पण दुखापतीमुळे तो 2022 च्या टी-20 विश्वचषकात सहभागी होऊ शकला नाही. जगातील महान वेगवान गोलंदाजांपैकी एक जेफ थॉमसनने म्हटले की, 'जसप्रीत बुमराह तिन्ही फॉरमॅटमध्ये जास्त काळ खेळू शकत नाही.' यासाठी त्यांनी मोठे कारण सांगितले आहे.
असे वक्तव्य या दिग्गजाने केले
वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन म्हणाला की, 'तीनपैकी कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळायचे आहे, हे जसप्रीत बुमराहवर (Jasprit Bumrah) अवलंबून आहे.' थॉमसनने पीटीआयशी केलेल्या संभाषणात सांगितले की, 'बुमराह तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. अशा परिस्थितीत त्याला दुखापत होणे सामान्य आहे. त्यामुळे आता त्याला काय करायचे आहे ते ठरवावे लागेल.'
मर्यादित षटकांमध्ये कमी चेंडू टाकावेत
पुढे बोलताना जेफ थॉमसन म्हणाला की, 'त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये (Cricket) खेळावे अशी प्रेक्षकांची इच्छा आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना पाहण्यासाठी मी स्टेडियममध्ये (Stadium) येतो. तो कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळतो यावर अवलंबून आहे, वनडेमध्ये फक्त 60 आणि टी-20 मध्ये 24 चेंडू टाकावे लागतात.'
करिअर लांबवण्यासाठी हे करावे लागते
जेफ थॉमसन पुढे म्हणाला की, 'कसोटी क्रिकेटमध्ये त्याला एका दिवसात 15 षटके टाकावी लागतील. तुमची कारकीर्द वाढवण्यासाठी तुम्ही कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळले पाहिजे हे तुम्हाला चांगले समजू शकते. दरवर्षी ज्या प्रकारे विश्वचषक स्पर्धा होत आहेत, त्यामुळे मर्यादित षटकांचे क्रिकेट कमी महत्त्वाचे झाले आहे.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.