भाजप सरकारच्या पराभवासाठी कार्यरत व्हा: गिरीश चोडणकर यांचे आवाहन

Goa: Get ready to defeat BJP says Girish Chodankar
Goa: Get ready to defeat BJP says Girish Chodankar
Published on
Updated on

पणजी: भाजप सरकारला उतरती कळा लागली असून मागील लोकसभा निवडणुकीत गोमंतकीयांनी काँग्रेस पक्षाच्या मतांची टक्केवारी ६.३२ टक्के वाढवून तसा संदेश दिला आहे. त्यामुळे जनभावनेचा आदर करून भ्रष्ट व असंवेदनशील भाजप सरकारचा आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव करून काँग्रेसची सत्ता राज्यात स्थापन करण्यासाठी कार्यरत व्हावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केले. 

उत्तर गोवा जिल्हा काँग्रेसच्या विविध गट अध्यक्षांच्या आयोजित पहिल्या गटाच्या बैठकीत ते बोलत होते. मतविभागणी करण्यासाठी भाजप आता नवीन राजकीय पक्ष व संघटना जन्मास घालणार असून, गट समित्यांनी भाजपच्या धूर्त खेळीची लोकांना आताच जाणीव करून द्यावी असे गिरीश चोडणकर यांनी सांगितले. भाजपने अलोकशाही मार्गाने २०१७ मध्ये सत्ता काबीज केली, परंतु जनतेने २०१९ मध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी २.२२ टक्के कमी करून भाजपला जनतेच्या नापसंतीचा योग्य संदेश दिला असे गिरीश ते म्हणाले. 

काँग्रेस राज्यात आज जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका बजावत असून, खरी आकडेवारी व पुराव्याच्या आधारावरच सरकारच्या चुका दाखवित आहे. गोवा विधानसभा तसेच सार्वजनिक मंचावर जनतेचे विषय काँग्रेस पक्ष प्रभावीपणे मांडत असल्याचे काँग्रेसचे विधीमंडळ गट नेते दिगंबर कामत यांनी यावेळी सांगितले. खरे - खोटे समजण्यासाठी गोमंतकीय जनता सुज्ञ असून भाजपच्या या उत्सवबाजीला व घोषणांना बळी न पडता सत्याचीच साथ देणार असा विश्वास दिगंबर कामत यांनी व्यक्त केला. सर्व गट अध्यक्षांनी शिस्तीने व पक्षाच्या धोरणांनुसार कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

काँग्रेसचे मांद्रे, डिचोली, पणजी, साखळी, वाळपई, मयें, साळीगांव, म्हापसा, कुभांरजुवा, थिवी व पर्ये येथिल गट अध्यक्ष व निमंत्रक या बैठकीस हजर होते. सर्व गटाध्यक्षांना सदस्य नोंदणी मोहीम पुढे नेण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगण्यात आले. आगामी काळात पक्षातर्फे आयोजित करण्यात येणारे विविध कार्यक्रम यावर चर्चा करण्यात आली. प्रत्येक मतदारसंघात बुथ समिती निवडण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले तसेच स्थानिक विषयांवर भर देण्याचा सल्ला देण्यात आला.

संपादन: ओंकार जोशी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com