IND vs ENG: गिलबरोबरचा वाद, कुलदीपसोबतचं 700 विकेट्सबद्दल मजेशीर संभाषण, अँडरसनचा खुलासा

James Anderson: धरमशाला कसोटीदरम्यान शुभमन गिलबरोबर काय शाब्दिक चकमक झालेली आणि कुलदीप यादवबरोबर काय संभाषण झालेलं, याबद्दल जेम्स अँडरसनने खुलासा केला आहे.
James Anderson - Shubman Gill
James Anderson - Shubman GillANI

James Anderson reveals verbal exchange with Shubman Gill

भारत विरुद्ध इंग्लंड संघात नुकतीच पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेत भारताने 4-1 अशा फरकाने विजय मिळवला. मालिकेतील अखेरचा सामना धरमशाला येथे झाला होता,ज्यात भारताने एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला होता.

याच सामन्यादरम्यान दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमकही झाली होती. आता याबद्दल अँडरसनने भाष्य केले असून शुभमन गिलबरोबर नक्की काय संभाषण झाले होत, याबद्दल खुलासा केला आहे.

धरमशाला कसोटीत जॉनी बेअरस्टो दुसऱ्या डावात फलंदाजीला आला असताना त्याने गिलला प्रश्न विचारला होता की त्याने अँडरसनला निवृत्तीवरून का विचारलेलं. त्यावेळी गिलनेही अँडरसनने त्याला शतकानंतर बाद केलेलं, असं प्रत्युत्तर दिले होते.

James Anderson - Shubman Gill
IND vs ENG, Test: गिल-बेअरस्टो लाईव्ह सामन्यात भिडले, सर्फराज-जुरेलचीही शाब्दिक वादात उडी

त्यांच्यातील ही शाब्दिक चकमक स्टंप माईकमध्ये कैद झालेली. त्यानंतर गिलला यासंदर्भात सामन्यानंतर पोस्ट मॅच शोमध्ये विचारण्यातही आलेले, परंतु, त्याने यासंदर्भात खुलासा करण्यास नकार दिला होता.

मात्र आता बीबीसीच्या टेलएंडर्स पॉडकास्टमध्ये बोलताना अँडरसनने गिलबरोबर झालेल्या संभाषणाबद्दल सांगितले आहे. अँडरसन म्हणाला, 'तू भारताबाहेर काही धावा केल्या आहेत का? अशा अर्थाने मी त्याला काहीतरी म्हणालो होतो. त्यावर तो मला म्हणालेला की आता निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे. त्यानंतर दोन चेंडू झाल्यानतंर मी त्याला बाद केलं.'

भारताच्या पहिल्या डावात अँडरसनने गिलला 110 धावांवर बाद केले होते. त्यावेळी गिल त्याची 699 वी कसोटी विकेट ठरला होता. त्यानंतर अँडरसनने याच डावात कुलदीप यादवला बाद करत 700 वी कसोटी विकेट घेतली. त्यामुळे तो 700 कसोटी विकेट्स घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला, तर एकूण तिसरा गोलंदाज ठरला.

James Anderson - Shubman Gill
James Anderson @700: 'मैंने बोला था...', कसोटीत सर्वाधिकवेळा बाद केलेल्या अँडरसनवर सचिन तेंडुलकरने उधळली स्तुतीसुमने

दरम्यान, या पॉडकास्टवेळी अँडरसनने कुलदीप यादवबरोबर झालेल्या मजेशीर संवादाबद्दलही खुलासा केला.

अँडरसन म्हणाला, 'कुलदीप यादवने थर्डमॅनच्या दिशेने शॉट खेळला आणि तो एक धाव काढत नॉन-स्ट्रायकर एन्डला आला. मी पुन्हा चेंडू टाकण्यासाठी जात असताना तो म्हणाला, मी तुझी 700 वी विकेट ठरणार आहे. तो मुद्दाम बाद होण्याच्या हेतूने बोलत नव्हता, तर तो म्हणाला की त्याला फक्त असं वाटत होतं. त्यानंतर आम्ही दोघेही हसलो.'

दरम्यान, कुलदीपला जे वाटत होते, तेच नंतर खरे ठरले आणि अँडरसनने त्याला बाद करत ७०० कसोटी विकेट्स पूर्ण केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com