ISL Football : 'नॉर्थईस्ट'समोर 'एफसी गोवा'चे तगडे आव्हान; फातोर्ड्यात होणार लढत

एफसी गोवाची नजर तीन गुणावर
ISL Football
ISL FootballDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर यंदा इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत चारपैकी तीन सामने जिंकलेल्या एफसी गोवाची नजर शनिवारी (ता. 17) पूर्ण तीन गुणावर असेल, कारण त्यांचा प्रतिस्पर्धी संघ नॉर्थईस्ट युनायटेड आतापर्यंत सर्व नऊही सामन्यांत पराभूत झालेला आहे.

( ISL football tournament match between Northeast United vs FC Goa will be played at Fatorda)

एफसी गोवा शनिवारी घरच्या मैदानावर या वर्षातील अखेरचा सामना खेळेल. विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केल्यास ते प्ले-ऑफ फेरीतील संघांत स्थान कायम राखू शकतील. सध्या एफसी गोवाचे 9 लढतीतील 5 विजयांमुळे 15 गुण आहेत. फातोर्ड्यात त्यांनी गतआठवड्यात ओडिशा एफसीचा 3-0 फरकाने पराभूत केले होते. स्पर्धेत आठ पराभव पत्करल्यानंतर नॉर्थईस्ट युनायटेडने प्रशिक्षक बदलला, परंतु व्हिन्सेंझो अनेज यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना मागील सामन्यात चेन्नईयीन एफसीकडून 7-3 फरकाने हार पत्करावी लागली.

पेनया यांच्यामते प्रतिस्पर्धी तुल्यबळ

नॉर्थईस्ट युनायटेडला सलग पराभव पत्करावे लागले असले, तरी एफसी गोवाचे प्रशिक्षक कार्लोस पेनया त्यांना तुल्यबळ प्रतिस्पर्धी मानतात. त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले, की ‘‘त्यांनी काही सामने गमावले असले, तरी त्याचा परिणाम होणार नाही.

उद्याचा दिवस वेगळा आहे. त्यांना स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी असेल. त्यांच्यापाशी कितीतरी चांगले खेळाडू आहेत, जे विजयाच्या शोधात आहेत. आमच्या दृष्टीने विचार करता, तीन गुण कसे मिळतील हेच लक्ष्य कायम राहील.’’

ISL Football
Portugal Football: रोनाल्डोला बेंचवर बसवणाऱ्या कोचचा राजीनामा; इमोशनल Video व्हायरल

संघाला आत्मविश्वास गवसला

एफसी गोवाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा संघात आत्मविश्वास पुन्हा जागवणे हेच प्रमुख उद्दिष्ट होते. आम्ही आता नऊ सामने खेळलो आहोत, काही लढती गमावल्या असल्या तरी आम्ही चांगला खेळ केलेला आहे. संघ निश्चयी बनला आहे.

कोणतेही आव्हान स्विकारू हा विश्वास संघाला वाटत आहे, आणि ही बाब खूपच महत्त्वाची आहे, असे पेनया यांनी आपल्या संघाविषयी सांगितले. आम्ही ओडिशाविरुद्ध चांगला खेळ केला व सकारात्मक निकाल नोंदविला. त्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे. चांगल्या कामगिरीच्या बळावर मोसमात असलेले आमचे उद्दिष्ट साध्य करू, असे एफसी गोवाच्या मार्गदर्शकाने ठासून सांगितले.

ISL Football
Ranji Trophy : राजस्थानच्या फलंदाजांनी हिरावला गोव्याचा विजय; मोहित रेडकरच्या पदार्पणातच 5 विकेट

मैदानात उतरण्यापूर्वी...

- आयएसएल स्पर्धेत नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धच्या 16 लढतीत एफसी गोवाचे 5 विजय

- 8 लढती बरोबरीत, नॉर्थईस्ट युनायटेडचे 3 विजय

- गतमोसमात नॉर्थईस्ट 2-1 फरकाने विजयी, तर दुसऱ्या टप्प्यात 1-1 गोलबरोबरी

- यंदा स्पर्धेत सर्वाधिक 25 गोल नॉर्थईस्ट युनायटेडने आतापर्यंत स्वीकारले

- एफसी गोवाच्या नोआ सदावी याचे 9 लढतीत 5 गोल, 3 असिस्ट

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com