ISL Football: एफसी गोवा अपराजित, पण विजय हुकला

नॉर्थईस्ट युनायटेडने १-१ गोलबरोबरीत रोखले
नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध गोल केल्यानंतर आनंदित झालेले एफसी गोवा संघातील खेळाडू.
नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध गोल केल्यानंतर आनंदित झालेले एफसी गोवा संघातील खेळाडू.Dainik Gomantak

Indian Super League Football: एफसी गोवाने इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा खंडित होण्यापूर्वी वर्षअखेरीस अपराजित राहण्यात यश मिळविले, पण शुक्रवारी नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध त्यांना विजय शक्य झाला नाही आणि १-१ अशा गोलबरोबरीवर समाधान मानावे लागले.

सामन्यातील दोन्ही गोल पूर्वार्धातील खेळात सहा मिनिटांच्या अंतराने झाले. कार्लोस मार्टिनेझ याच्या अगदी जवळून हेडिंगचा प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला अंदाज आला नाही आणि एफसी गोवा संघाने २०व्या मिनिटास आघाडी घेतली. मात्र ती जास्त काळ टिकली नाही.

एफसी गोवाच्या बचावफळीस एम. एस. जिथिन याच्या पहारा ठेवता आला नाही. त्याचा लाभ उठवत या मध्यरक्षकाने २६व्या मिनिटाला नॉर्थईस्ट युनायटेडला बरोबरी साधून दिली.

नॉर्थईस्टच्या बचावफळीने एफसी गोवा संघाला मोकळीक दिली नाही, त्यामुळे त्यांना सराईतपणे मुक्त खेळ करता आला नाही.

नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध गोल केल्यानंतर आनंदित झालेले एफसी गोवा संघातील खेळाडू.
Goa Staff Selection Commission च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दिली नववर्षाची भेट; 33 पदांसाठी पहिली जाहिरात प्रसिद्ध

बरोबरीमुळे दुसरे स्थान

केरळा ब्लास्टर्सचे आता १२ लढतीतून २६ गुणांसह अव्वल स्थानी कायम राहिले. एफसी गोवा आणि ओडिशा एफसीचे प्रत्येकी २४ गुण झाले आहेत. +११ गोलसरासरीमुळे एफसी गोवा दुसऱ्या, तर +१० गोलसरासरीमुळे ओडिशा एफसी तिसऱ्या क्रमांकावर आहे.

एफसी गोवाने आता १० लढतीत सात विजय व तीन बरोबरी अशी कामगिरी साधली आहे. नॉर्थईस्ट युनायटेडची ही सहावी बरोबरी ठरली.

१२ लढतीनंतर त्यांचे १२ गुण झाले असून सहावा क्रमांक कायम आहे. नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्धच्या १९ आयएसएल लढतीत एफसी गोवाची ही दहावी बरोबरी ठरली.

नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध गोल केल्यानंतर आनंदित झालेले एफसी गोवा संघातील खेळाडू.
Panaji Bus Route: पणजीतील बस मार्गांचे 19 जानेवारीपर्यंत राष्ट्रीयीकरण करणार, 7 मार्ग प्रस्तावित...

ओडिशाचा दणदणीत विजय

दरम्यान, शुक्रवारी भुवनेश्वर येथे झालेल्या आणखी एका सामन्यात ओडिशा एफसीने जमशेदपूर एफसीवर ४-१ फरकाने दणदणीत विजय नोंदविला.

त्यांचा हा १२ लढतीतील सातवा विजय असून २४ गुण झाले आहेत. जमशेदपूरला सातवा पराभव पत्कारावा लागल्यामुळे १२ लढतीनंतर नऊ गुण कायम राहिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com