Goa Staff Selection Commission च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी दिली नववर्षाची भेट; 33 पदांसाठी पहिली जाहिरात प्रसिद्ध

काही आमदार, मंत्र्यांच्या विरोधानंतरही मुख्यमंत्र्यांचा धाडसी निर्णय
Dr. Pramod Sawan | Goa Staff Selection Commission
Dr. Pramod Sawan | Goa Staff Selection CommissionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Staff Selection Commission: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यातील नोकरभरती स्टाफ सिलेक्शन आयोगामार्फत होईल, अशी घोषणा केली होती. आणि आता 33 जाहिरातींसाठी नोकरभरती आयोगाची पहिली जाहीरात जारी करण्यात आली आहे.

या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी त्यांचा शब्द पाळला असून गोमंतकीयांना नववर्षाची भेट दिली आहे.

Dr. Pramod Sawan | Goa Staff Selection Commission
Panaji Bus Route: पणजीतील बस मार्गांचे 19 जानेवारीपर्यंत राष्ट्रीयीकरण करणार, 7 मार्ग प्रस्तावित...

दरम्यान, काही आमदार आणि मंत्र्यांचा अशा पद्धतीने आयोगामार्फत नोकरभरती करण्यास विरोध असल्याचे समजते. तरीही हा विरोध डावलून मुख्यमंत्र्यांनी धाडसी निर्णय घेतल्याचे समजते.

अडचणी निर्माण करणाऱ्या काही सरकारी अधिकाऱ्यांना बाजूला काढून ही पहिली 33 पदांसाठीची जाहिरात जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 जानेवारी 2024 अशी आहे.

Dr. Pramod Sawan | Goa Staff Selection Commission
Goa PWD: सावधान! आता 2 महिने पाणी बिल न भरल्यास होणार 'ही' कारवाई

अशी आहेत पद, विभाद आणि पदसंख्या

  • नेटवर्किंग इंजिनिअर ----- वाहतूक संचलनालय ---- 03

  • लॅबोरेटरी टेक्निशियन ----- पोलिस ---- 01

  • असिस्टंट सब इन्स्पेक्टर (वायरलेस ऑपरेटर) ---- पोलिस ---- 01

  • टेक्निशिय (इलेक्ट्रॉनिक्स/फिजिक्स) ---- उच्च शिक्षण संचलनालय ---- 03

  • लायब्ररीयन ग्रेड 1 ----- उच्च शिक्षण संचलनालय ----- 08

  • लायब्ररीयन ग्रेड 2 ----- उच्च शिक्षण संचलनालय ----- 08

  • ड्रॉविंग टीचर्स इन सेकंडरी स्कूल्स ----- उच्च शिक्षण संचलनालाय -- 07

  • कनव्हर्सेशन असिस्टंट ----- डिरेक्टोरेट ऑफ म्युझियम ----- 01

  • लाईट हाऊस कीपर ------ कॅप्टन ऑफ पोर्ट्स विभाग ---- 01

Attachment
PDF
Goa Staff Selection Commission advertisement for 33 posts.pdf
Preview

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com