VIDEO: धोनी स्टाईल गेम प्लॅन अन् ईशान किशनचा मास्टरस्ट्रोक! बापूनं जोस बटलरला केलं क्लीन बोल्ड; 'त्या' सल्ल्यानं खेळ खल्लास

Ishan Kishan Stump MIC Advice To Axar Patel: ईशानला बॅटने फारशी कमाल दाखवता आली नाही, तरीही विकेटच्या मागे त्याने दाखवलेली हुशारी आणि अचूक रणनीती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
Ishan Kishan celebrating with Axar Patel after the dismissal of Jos Buttler during India vs England ODI
Ishan Kishan Stump MIC Advice To Axar PatelDainik Gomantak
Published on
Updated on

Ishan Kishan Stump MIC Advice To Axar Patel: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक महत्त्वाचा बदल केला होता. के. एल. राहुल आजारी असल्यामुळे युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची सुवर्णसंधी मिळाली. या सामन्यात ईशानला बॅटने फारशी कमाल दाखवता आली नाही, तरीही विकेटच्या मागे त्याने दाखवलेली हुशारी आणि अचूक रणनीती सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.

कार्डिफ येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात यजमान इंग्लंडचा संघ विजयासाठी 234 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता. इंग्लंडने अवघ्या 94 धावांवर आपले पहिले 4 महत्त्वाचे गडी गमावले होते. मात्र, त्यानंतर जो रुट आणि बटलर यांनी डाव सावरत 31 धावांची भागीदारी रचली आणि टीम इंडियाची डोकेदुखी वाढवण्यास सुरुवात केली होती. भारताला या जोडीला लवकरात लवकर बाद करणे गरजेचे होते.

Ishan Kishan celebrating with Axar Patel after the dismissal of Jos Buttler during India vs England ODI
ENG vs IND 1st ODI: कॅच तर घेतला, पण श्वास रोखला! लाईव्ह मॅचमध्ये शुभमन-गुरनूर जोरदार धडकले; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

या कठीण प्रसंगी डावातील 26 वे षटक टाकण्यासाठी फिरकीपटू अक्षर पटेल गोलंदाजीला आला. षटकातील तिसऱ्या चेंडूनंतर यष्टीरक्षक ईशान किशनने (Ishan Kishan) खेळपट्टीचा नूर ओळखून यष्टीमागून अक्षरला एक मोलाचा सल्ला दिला. ईशान म्हणाला, "मला असे वाटते की, स्टंपच्या रेषेत टाकलेला चेंडू खेळपट्टीवर फसून येत आहे. तू अशाच टप्प्यावर चेंडू टाकत राहा, तो नक्की फिरेल." ईशानचा हा सल्ला अक्षरने मनावर घेतला आणि पुढचाच चेंडू अगदी त्याच नियोजित टप्प्यावर टाकला. बटलरने या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूने चकवा दिला आणि बटलर थेट 17 धावांवर बोल्ड होऊन तंबूत परतला. या एका हुशारीने भारताला सामन्यातील सर्वात मोठा 5 वा बळी मिळवून दिला.

Ishan Kishan celebrating with Axar Patel after the dismissal of Jos Buttler during India vs England ODI
IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

केवळ चतुर सल्ल्यापुरतेच मर्यादित न राहता, ईशानने या सामन्यात यष्टीमागे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत एकूण चार झेल टिपले. यासह त्याने भारतीय यष्टीरक्षकांच्या एका खास क्लबमध्ये आपले नाव नोंदवले. वनडे सामन्याच्या सुरुवातीच्या चारही विकेट्स मिळवण्यात यष्टीमागे योगदान देणारा तो भारताचा संयुक्तपणे तिसरा यष्टीरक्षक ठरला. या यादीत भारताचा महान कर्णधार महेंद्रसिंग धोनी अव्वल स्थानी आहे, ज्याने 2007 मध्ये लीड्स येथे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीच्या पाच विकेट्समध्ये यष्टीमागे भूमिका बजावली होती. ईशानच्या या दमदार यष्टीरक्षणामुळे आणि अचूक मार्गदर्शनामुळे भारताला इंग्लंडवर दबाव आणण्यात यश आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com