IND vs BAN: तिसऱ्या ODI सामन्यात हिटमॅनच्या जागी कोण येणार सलामीला?

India vs Bangladesh 3rd ODI: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला 1 विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता.
Rohit Sharma
Rohit Sharma Dainik Gomantak
Published on
Updated on

India vs Bangladesh 3rd ODI: बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला 1 विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यासह टीम इंडियाने मालिका 0-2 ने गमावली आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा तिसऱ्या वनडेत खेळू शकणार नाही. अशा स्थितीत, त्याच्या जागी ओपनिंग कोण करणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवनची सलामी निश्चित दिसत आहे. त्याचा नवा जोडीदार होण्यासाठी टीम इंडियाचे 3 स्टार खेळाडू आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया...

3 खेळाडू सलामीचे मोठे दावेदार

कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) दुखापतीमुळे केएल राहुल टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे. शिखर धवनसोबत केएल राहुल (KL Rahul), ईशान किशन आणि राहुल त्रिपाठी सलामीला उपस्थित आहेत. हे तिन्ही खेळाडू स्फोटक फलंदाजीत तरबेज आहेत. कोणत्याही गोलंदाजीला ते मोडून काढू शकतात, एवढी क्षमता त्यांच्यात आहे.

Rohit Sharma
IND vs BAN: वनडेनंतर आता कसोटीत टीम इंडियाला चॅलेंज देणार बांगलादेश, असा आहे संपूर्ण संघ

दरम्यान, ईशान किशनने याआधी टीम इंडियाच्या ओपनिंगची जबाबदारी सांभाळली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 93 धावांची शानदार खेळी खेळली. त्याने भारतासाठी 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 267 धावा केल्या आहेत.

केएल राहुल मोठा दावेदार

शिखर धवनसोबत सलामीसाठी केएल राहुल मोठा दावेदार आहे. जर राहुलने धवनसोबत सलामी दिली, तर डावे आणि उजवे संयोजनही तयार होईल, त्यामुळे विरोधी गोलंदाजांना गोलंदाजी करताना अडचणी येऊ शकतात. राहुलला भावी कर्णधार मानले जाते. राहुलने 47 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1752 धावा केल्या आहेत.

Rohit Sharma
IND vs BAN: तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाचा आधार बनणार 'चायनामन'

स्फोटक फलंदाज

राहुल त्रिपाठीने आयपीएलमध्ये अनेक शानदार कामगिरी करुन सर्वांची मने जिंकली होती. तो सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वात मोठा सामना विजेता म्हणून उदयास आला. त्याने आयपीएल 2022 च्या 14 सामन्यांमध्ये 413 धावा केल्या, ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. हा 31 वर्षीय खेळाडू बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियात पदार्पणाची वाट पाहत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com