Ishan Kishan: 'मी एवढा मोठा नाही की धोनीच्या...', ऑटोग्राफ मागणाऱ्या चाहत्याला ईशानचे उत्तर

ईशान किशनने ऑटोग्राफ मागणाऱ्या चाहत्याला दिलेल्या उत्तराने अनेकांची मनं जिंकली आहेत.
Ishan Kishan
Ishan KishanDainik Gomantak

Ishan Kishan: भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन केल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्याने काहीदिवसांपूर्वीच बांगलादेशविरुद्ध वनडेत विक्रमी द्विशतकी खेळी केली होती. त्यानंतर आता तो सध्या झारखंड संघाकडून रणजी ट्रॉफीतील सामने खेळण्यात व्यस्त आहे. याचदरम्यान, त्याच्या एका कृतीने एमएस धोनीच्या चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Ishan Kishan
Ishan Kishan: फक्त ईशानच नाही तर त्याची गर्लफ्रेंडही 'करोडपती', नेटवर्थ जाणून तुम्हीही म्हणाल...

नक्की काय झाले?

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसतंय त्यानुसार रणजी ट्रॉफी खेळण्याच व्यस्त असलेल्या ईशानकडे एका चाहत्याने स्वाक्षरीची मागणी केली. तोही स्वाक्षरी देण्यास तयार झाला. पण जेव्हा चाहत्याने स्वाक्षरीसाठी त्याचा फोन ईशानच्या पुढे केला, तेव्हा त्याने पाहिले की त्यावर आधीच धोनीने स्वाक्षरी केलेली आहे.

ते पाहून ईशानने लगेचच धोनीच्या स्वाक्षरीच्या वर त्याची स्वाक्षरी देण्यास नकार दिला. तो हे देखील म्हणाला की स्वाक्षरी घेण्यासाठी दुसरी कोणती गोष्ट नाहीये का. कारण त्यावर धोनीची स्वाक्षरी आधीच आहे. अखेर चाहत्याच्या आग्रहास्तव त्याने धोनीच्या स्वाक्षरी खाली त्याची स्वाक्षरी केली.

पण ही स्वाक्षरी करताना 'धोनीइतके अजून आपण मोठे झालेलो नाही, त्यामुळे मी तळाला स्वाक्षरी करतो', असेही ईशान म्हणताना व्हिडिओत दिसतो.

ईशान आणि धोनी हे झारखंड संघाकडून एकत्रही यापूर्वी खेळले आहेत. सध्या ईशान जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यातही शतकी खेळी केली होती. पण, गोव्याविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी त्याला ११ जणांच्या संघात संधी देण्यात आलेली नाही.

धोनीबाबत बोलायचे झाल्यास तो आता आगामी आयपीएल २०२३ हंगामात खेळताना दिसेल. या हंगामात तो चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करताना दिसेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com