Ishan Kishan: फक्त ईशानच नाही तर त्याची गर्लफ्रेंडही 'करोडपती', नेटवर्थ जाणून तुम्हीही म्हणाल...

Ishan Kishan And Aditi Hundia Net Worth: बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावून ईशान किशनने इतिहास रचला. ईशान किशन वयाच्या 24 व्या वर्षी करोडोंच्या मालमत्तेचा मालक आहे.
Ishan Kishan And Aditi Hundia
Ishan Kishan And Aditi HundiaDainik Gomantak

Ishan Kishan And Aditi Hundia Net Worth: बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावून ईशान किशनने इतिहास रचला. ईशान वयाच्या 24 व्या वर्षी करोडोंच्या मालमत्तेचा मालक आहे, पण त्याची गर्लफ्रेंड अदिती हुंडियाही कमाईच्या बाबतीत कमी नाही. आज आमच्या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला दोघांच्या संपत्तीबद्दल सांगणार आहोत, जे जाणून तुम्हीही थक्क व्हाल.

दरम्यान, आदिती हुंडिया ही ईशान किशनची गर्लफ्रेंड आहे. बांगलादेशविरुद्ध ईशानच्या द्विशतकानंतर आदिती हुंडियाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले. अदिती एक प्रसिध्द मॉडेल आहे. ती 2017 मध्ये फेमिना मिस इंडिया फायनलिस्ट आहे. 2018 मध्ये तिने मिस सुपरनॅशनल इंडिया अवॉर्ड जिंकला आहे. अदितीच्या नेट वर्थबद्दल बोलायचे झाल्यास, तर ती मॉडेलिंग आणि ब्रँड्सच्या जाहिरातींमधून कमाई करते.

Ishan Kishan And Aditi Hundia
Ishan Kishan फक्त नाही, तर 'या' 7 खेळाडूंनी केलंय वनडे द्विशतक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदिती हुंडियाची एकूण संपत्ती 2 ते 3 दशलक्ष डॉलर्स दरम्यान आहे. अदितीने इंडिया इंटरनॅशनल स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतले. 2022 मध्ये ईशान किशनची (Ishan Kishan) एकूण संपत्ती 45 कोटी रुपये आहे. क्रिकेटमधील मॅच फी, लीग क्रिकेट करार आणि ब्रँड एंडोर्समेंट हे त्याच्या उत्पन्नाचा स्रोत आहे. त्याचवेळी, आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) ईशान किशनला 15.25 कोटी रुपयांना खरेदी केले.

Ishan Kishan And Aditi Hundia
Ishan Kishan: इशानने इतिहास रचला, ठरला सर्वात जलद द्विशतक ठोकणारा खेळाडू

तसेच, ईशान किशनच्या कार कलेक्शनमध्ये फोर्ड मस्टँग, बीएमडब्ल्यू 5 सीरीज आणि मर्सिडीज बेंझ सी-क्लास सारख्या आलिशान कारचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com