India vs Australia, 1st T20I Match at Visakhapatnam, Ishan Kishan 5 Sixes Record:
भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध विशाखापट्टणम झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात 2 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.
भारताच्या या विजयात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन यांनी अर्धशतके झळकावत मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, ईशानने एक मोठा विक्रमही नावावर केला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ईशानने 39 चेंडूत 58 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 2 चौकार आणि 5 षटकार मारले. त्यामुळे ईशान आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.
त्याने ऋषभ पंतच्या विक्रमाला मागे टाकले आहे. पंतने 2019 साली गयानाला वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात 42 चेंडूत नाबाद 65 धावांची खेळी करताना 4 षटकार मारले होते.
दरम्यान, ईशान आणि पंत यांच्या पाठोपाठ आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या यष्टीरक्षकांमध्ये एमएस धोनी, केएल राहुल आणि दिनेश कार्तिक देखील आहेत.
धोनीने चार टी20 सामन्यांमध्ये प्रत्येकी 3 षटकार मारले आहेत, तर दिनेश कार्तिक आणि केएल राहुलने प्रत्येकी एकदा आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये प्रत्येकी 3 षटकार मारले आहेत. तसेच ईशान आणि पंत यांनीही एकदा आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये प्रत्येकी 3 षटकार मारले आहेत.
ईशानने गुरुवारी केलेले अर्धशतक हे भारताचा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये केलेले दुसरे अर्धशतक होते. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या भारतीय यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
त्याने एमएस धोनी आणि ऋषभ पंत यांची बरोबरी केली आहे. पंत आणि धोनी यांनीही आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारतासाठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून २ अर्धशतके केली आहेत. या यादीत तीन अर्धशतकांसह अव्वल क्रमांकावर केएल राहुल आहे.
दरम्यान, भारताने 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग 19.5 षटकात 8 विकेट्स गमावत पूर्ण केला. भारताकडून ईशान व्यतिरिक्त सूर्यकुमार यादवने 42 चेंडूत 80 धावांची खेळी केली.
तसेच यशस्वी जयस्वालने 8 चेंडूत 21 धावा आणि रिंकू सिंगने 14 चेंडूत 22 धावांची छोटेखानी खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून तन्वीर संघाने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.
तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने जॉस इंग्लिसच्या (110) शतकाच्या आणि स्टीव्ह स्मिथने (52) अर्धशतकाच्या जोकावर 20 षटकात 3 बाद 208 धावा केल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.