रोहीतला लाभेल का विराटची साथ? इरफान म्हणाला...

विराट कोहली आता कर्णधार नाही, परंतु जोपर्यंत तो संघात आहे, तोपर्यंत तो लीडर आहे. तसेच तो नवीन कर्णधाराला योग्य गोष्टी करण्यास मदत सुध्दा करेल.
Irfan Pathan
Irfan PathanDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

भारत आणि वेस्टइंडीज यांच्या मध्ये 6 फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची वन-डे आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. तर तेवढ्याच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका ही खेळली जाणार आहे. यात विशेष म्हणजे रोहित शर्मा हा पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिल्यांदाच वनडे संघाच्या कर्णधारपदासाठी मैदानात उतरणार आहे तर आणि माजी कर्णधार संघात तो फलंदाज म्हणून खेळेणार आहे.

Irfan Pathan
अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या कर्णधाराने रचला इतिहास

विराट कोहलीचं (Virat Kohali) संघातील वास्तव्य कर्णधार रोहित शर्माला साथ देणार की त्याचं काम अधिक कठीण असेल, यावर इरफान पठाणनं आपलं म्हणणं मांडलं आहे. इरफान पठाण म्हणाला की, जोपर्यंत तो संघात आहे तोपर्यंत विराट लीडर म्हणूनच खेळणार आहे.

इरफान पठाणने (Irfan Pathan) माध्यमांशी बोलतांना सांगितले की, " विराट कोहली आता कर्णधार नाही, परंतु जोपर्यंत तो संघात आहे, तोपर्यंत तो लीडर आहे. तसेच तो नवीन कर्णधाराला योग्य गोष्टी करण्यास मदत सुध्दा करेल. विराटने संघाला योग्य तेच संदेश दिले असून फिटनेसला खूप उच्च स्तरावर नेले आहे. पुढे मला मनापासून आशाआहे की, तो बाकीच्या खेळाडूंना, विशेषत: रोहित शर्माला (Rohit Sharma) मदत करेल. प्रत्येक कर्णधार हा विशिष्ट पद्धतीने योगदान देत असते. विराट कोहलीकडे स्वत:ची ऊर्जा आहे, तर रोहित संघात शांतता आणतो. '

दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी रोहित शर्माला टी-20 नंतर वनडे टीमचा कर्णधारही बनवण्यात आलं होतं. रोहित दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नाही. त्यामुळे त्याच्या जागी वनडे संघात केएल राहुलला संधी देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारताला 0-3 अशा पराभवाला सामोरे जावे लागले, अशा परिस्थितीत पूर्णवेळ कर्णधार रोहित संघाचे नेतृत्व कसे करतो याकडे सर्वांचे लक्ष असेल. रोहित इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com