ZIM vs IRE: T20 मालिकेत आयर्लंडचा झिम्बाब्वेला 'दे धक्का'; तिसऱ्या T20 मध्ये टेक्टर-डॉकरेलची कमाल

Ireland Beats Zimbabwe T20 Series: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये झिम्बाब्वेचा संघ पात्र ठरु शकला नाही.
ZIM vs IRE
ZIM vs IREDainik Gomantak
Published on
Updated on

Ireland Beats Zimbabwe T20 Series: एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये झिम्बाब्वेचा संघ पात्र ठरु शकला नाही. त्यानंतर आता 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठीही संघ पात्र ठरु शकला नाही. आता पुन्हा एकदा संघाला मोठा धक्का बसला आहे, जेव्हा आयर्लंडने त्याच्याच घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत 2-1 ने पराभूत केले. कर्णधार सिकंदर रझा याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे पहिला सामना जिंकल्यानंतर झिम्बाब्वे संघाने त्याच्याविना शेवटचे दोन सामने गमावले. रझाला वगळणे संघाला महागात पडले आणि मालिका गमावून त्याचा फटका संघाला सहन करावा लागला. हॅरी टेक्टर हा या सामन्याचा नायक ठरला आणि त्याला मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणूनही निवडण्यात आले.

मालिकेची स्थिती काय होती?

दरम्यान, या मालिकेतील पहिला सामना झिम्बाब्वेने एका विकेटने जिंकला होता. त्या सामन्यात रझाने 65 धावा केल्या होत्या आणि विशेष म्हणजे, हॅटट्रिकही घेतली होती. त्यानंतर दुखापतीमुळे तो शेवटचे दोन सामने खेळू शकला नाही. त्यानंतर संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या T20 मध्ये आयर्लंडने 4 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या टी-20मध्ये आयर्लंडने 6 विकेट्सने विजय मिळवत मालिका 2-1 अशी खिशात घातली. यासह आयरिश संघाने मालिका 2-1 अशी जिंकली.

ZIM vs IRE
ZIM vs NED: सिकंदर रझाने रचला इतिहास, दोनच दिवसांत मोडला 'हा' मोठा विक्रम!

तिसऱ्या T20 मध्ये टेक्टर-डॉकरेलची शानदार कामगिरी

तिसर्‍या टी-20 सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्यांदा फलंदाजी करताना झिम्बाब्वे संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 140 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आयर्लंडची सुरुवात खराब झाली आणि अवघ्या 37 धावांत 4 गडी गमावले. पण इथून हॅरी टेक्टर आणि जॉर्ज डॉकरेलने डाव सांभाळला. त्याने 104 धावांची नाबाद शतकी भागीदारी केली. टेक्टरने नाबाद 54 आणि डॉकरेलने नाबाद 49 धावा केल्या. आयर्लंडने हा सामना 6 विकेटने जिंकला.

ZIM vs IRE
Pak Vs Zim: पाकिस्तानचा लाजीरवाणा पराभव! एक धाव राखून झिम्बाब्वेने केले पराभूत

दुसरीकडे, या दौऱ्यावर टी-20 मालिका जिंकल्यानंतर आता आयर्लंडचा सामना झिम्बाब्वेशी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत होणार आहे. 13 डिसेंबरपासून वनडे मालिका सुरु होणार आहे. तिन्ही टी-20 सामने हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळले गेले. तिन्ही वनडे सामनेही याच मैदानावर खेळवले जाणार आहेत. वनडे मालिका 17 डिसेंबरपर्यंत खेळवली जाणार आहे. आता झिम्बाब्वेचा संघ टी-20 पराभवाचा वनडे सामन्यात बदला घेऊ शकतो की नाही हे पाहायचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com