FIFA World Cup: कतारमध्ये राष्ट्रगीत गाण्यास इराणी संघाचा नकार, नेमकं झालं तरी काय?

Iran Vs England: इराणच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने सोमवारी इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात देशाचे राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला.
Iran National Football Team
Iran National Football TeamDainik Gomantak

FIFA World Cup: इराणच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने सोमवारी इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात देशाचे राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला. राष्ट्रगीत सुरु असताना सर्व खेळाडू शांत दिसत होते. याचे कारण इराणमध्ये सुरु असलेली हिजाबविरोधी निदर्शने असल्याचे सांगितले जात आहे. कतारमधील खलिफा इंटरनॅशनल स्टेडियमवर इराणचे राष्ट्रगीत वाजले तेव्हा सर्व खेळाडू गप्प बसले. फिफा विश्वचषक स्पर्धेतील ब गटातील पहिला सामना इंग्लंड आणि इराण यांच्यात होत आहे.

विशेष म्हणजे, 16 सप्टेंबर रोजी संपूर्ण इराणमध्ये (Iran) हिजाबविरोधी निदर्शने सुरु झाली. या निदर्शनांमागचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमिनीचा मृत्यू. इराणमध्ये 22 वर्षीय महसा अमिनीला हिजाब न घातल्यामुळे पोलिसांनी 13 सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले होते. पोलिसांनी (Police) कोठडीत तिला मारहाण केल्याचा आरोप आहे, त्यामुळे ती कोमात गेली होती. या घटनेच्या तीन दिवसांनंतर म्हणजेच 16 सप्टेंबर रोजी अमिनीचा मृत्यू झाला.

Iran National Football Team
FIFA World Cup 2022: फुटबॉल विश्वातील 'या' दोन दिग्गज खेळाडूंचा फोटो होतोय व्हायरल!

दुसरीकडे, 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर महसा अमिनीच्या मृत्यूवरुन दोन महिन्यांतील सर्वात मोठे आव्हान इराणसमोर आहे. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ देशव्यापी निदर्शने सुरु आहेत. शेकडो लोक मारले गेल्याची माहिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com