FIFA World Cup 2022: फुटबॉल विश्वातील 'या' दोन दिग्गज खेळाडूंचा फोटो होतोय व्हायरल!

FIFA World Cup 2022: फुटबॉल विश्वचषकापूर्वी क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांनी फोटोशूट केले असून, दोघांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
FIFA World Cup 2022
FIFA World Cup 2022Dainik Gomantak

फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 ला कालपासून कतारमध्ये सुरुवात झाली आहे. ग्रँड ओपनिंग सेरेमनीनंतर स्पर्धेतील सामन्यांना सुरुवात झाली. स्पर्धेत सहभागी झालेले 32 सामने कतारमध्ये पोहोचले आहेत. पण फिफाच्या ग्रँड ओपनिंग सेरेमनीपूर्वी एक फोटो जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. जग्गजेता लिओनेल मेस्सी (Lionel Messi) आणि फुटबॉल विश्वातील गोल मशिन ख्रिस्तियानो रोनाल्डोचा (Cristiano Ronaldo) फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याफोटोत फुटबॉल विश्वातील दोन दिग्गज खेळाडू एकमेकांसोबत बुद्धिबळ खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सी यांचा समावेश फुटबॉलमधील दिग्गज खेळाडूंमध्ये केला जातो. या दोन्ही दिग्गज खेळाडूंचा हा शेवटचा फिफा वर्ल्डकप असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आपल्या संघांचे नाव विश्वचषकावर कोरण्यासाठी दोन्ही खेळाडू प्रयत्नशील आहेत. अशातच स्पर्धेपूर्वी एक खास फोटोशूट (Photoshoot) करण्यात आले होते. त्या फोटोशूटसाठी मेस्सी आणि रोनाल्डो एकत्र आले होते. त्याच फोटोशूटमधील दोघांचा बुद्धिबळ खेळताना फोटो व्हायरल होत आहे.

FIFA World Cup 2022
Qatar vs Ecuador: यजमान कतारचा पहिल्याच सामन्यात पराभव; इक्वाडोरने 2-0 ने केली मात

लुई व्हिटॉन स्पॉन्सर्ड असलेल्या या फोटोशूटमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी एकत्र बुद्धिबळ खेळताना दिसले. दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्रामवर हा फोटो पोस्ट केला. या फोटोंना अनेकांना लाईक्सचा वर्षाव केला आहे. मेस्सी, रोनाल्डोच्या फॉलोअर्समध्ये जगभरातील असंख्य चाहत्यांसोबतच टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहलीचाही समावेश आहे. विजय ही मनाची स्थिती आहे, असे कॅप्शन फोटोला देत दोघांनी सोशल मिडियावर फोटो शेअर केला आहे.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) रोनाल्डोच्या पोस्टवर कमेंट केली आहे. कोहलीच्या या कमेंटलाही अनेकांना लाईक केलं आहे. दरम्यान, टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने ख्रिस्तियानो रोनाल्डो हा त्याच्या आवडता खेळाडू असल्याचं वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी विराट कोहली आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोनं एका जाहीरातील एकत्र कामही केलं होतं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com