IPLची कमाई इंग्लिश प्रीमियर लीगपेक्षा जास्त, सौरव गांगुलीचा मोठा दावा

आयपीएलच्या पुढील पाच वर्षांसाठी माध्यम हक्कांच्या लिलावातून बीसीसीआयला मोठा नफा मिळण्याची अपेक्षा आहे.
Sourav Ganguly
Sourav GangulyDainik Gomantak
Published on
Updated on

15 वर्षांच्या इतिहासात, इंडियन प्रीमियर लीग (IPL) केवळ क्रिकेटच्याच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातील एक प्रमुख लीग म्हणून उदयास आली आहे. आयपीएलच्या पुढील पाच वर्षांसाठी माध्यम हक्कांच्या लिलावातून बीसीसीआयला मोठा नफा मिळण्याची अपेक्षा आहे. यासोबतच जगभरातील सर्व लीगमध्ये आयपीएलचा दर्जाही मोठा होणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी तर, आयपीएल कमाईच्या बाबतीत इंग्लिश प्रीमियर लीगपेक्षा पुढे असल्याचा दावा केला आहे. (IPL Media Rights)

Sourav Ganguly
पाकिस्तानचे टॉप-5 मध्ये स्थान पक्के तर दुसरीकडे भारतीय संघाचे मोठे नुकसान

आयपीएल ही जगातील दुसरी सर्वात महागडी लीग ठरणार असल्याची चर्चा आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले की, मी क्रिकेटची प्रगती पाहिली आहे. आम्ही आमच्या सुरुवातीला काही हजार रुपये कमावले. पण आता खेळाडूंमध्ये करोडोंची कमाई करण्याची क्षमता आहे. बीसीसीआय फक्त चाहत्यांच्या जोरावर चालत आहे. चाहत्यांनी क्रिकेटला बनवले आहे. क्रिकेट चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा खेळ आहे. आयपीएलने इंग्लिश प्रीमियर लीगपेक्षा जास्त कमाई केली आहे. क्रिकेटला मिळालेल्या प्रेमामुळे हा खेळ अधिक भक्कम झाला आहे.

आयपीएल पुढे जाण्यासाठी सज्ज

बीसीसीआयने गेल्या पाच वर्षांत मीडिया हक्कांच्या लिलावातून सुमारे 17,000कोटी रुपये कमावले होते. याचा अर्थ बीसीसीआयला मीडिया हक्कांच्या लिलावातून सुमारे 65 कोटी रुपयांची कमाई होत होती. त्यामुळेच जगभरातील सर्व लीगमध्ये आयपीएल कमाईच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर होती.

Sourav Ganguly
स्टार रोनाल्डोच्या बलात्कार प्रकरणात न्यायालयाने दिला 'हा' निर्णय

पण आता नवीन मीडिया हक्कांच्या लिलावामुळे आयपीएल चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर जाईल, असा अंदाज लावला जात आहे. सध्या नॅशनल फुटबॉल लीगच्या एका सामन्यातून १३३ कोटींची कमाई होते. आता असे मानले जात आहे की बीसीसीआय आयपीएल सामन्याच्या मीडिया अधिकारांमधून 100 कोटींहून अधिक कमाई करेल. त्याच वेळी, इंग्लिश प्रीमियर लीगमधील प्रत्येक सामन्यातील मीडिया हक्कांची कमाई 84 कोटी रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com