स्टार रोनाल्डोच्या बलात्कार प्रकरणात न्यायालयाने दिला 'हा' निर्णय

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो वर दीर्घकाळापासून अमेरिकेमध्ये बलात्कार प्रकरणाची केस चालू होती.
Cristiano Ronaldo
Cristiano RonaldoDainik Gomantak
Published on
Updated on

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) वर दीर्घकाळापासून अमेरिकेमध्ये बलात्कार प्रकरणाची केस चालू होती. त्यात आता दिवाणी न्यायाधीशांनी निकाल सुनावला आहे. नेवाडाच्या कॅथरीन मायोग्राने 2009 मध्ये आरोप केला होता की, पोर्तुगालच्या सुपरस्टार फुटबॉलपटूने लास वेगासमधील हॉटेलमध्ये तिच्यावर हल्ला केला आणि नंतर बलात्कार केला आहे. (Cristiano Ronaldo Rape Case)

Cristiano Ronaldo
SL vs AUS: श्रीलंकेने रचला इतिहास! शेवटच्या 3 षटकात केल्या 59 धावा

या 42 पानी निर्णयात रोनाल्डोची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. खरेतर, 42 पानांच्या निकालात म्योग्राच्या वकिलाने खटल्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन केले नाही तर त्याचा गैरवापर केला असे म्हटले गेले आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढे ढकलता येत नाही.

क्रिस्टियानो रोनाल्डो जगातील सर्वात प्रसिद्ध आणि महागड्या फुटबॉलपटूंपैकी एक आहे तर तो पोर्तुगालचा आहे आणि मँचेस्टर युनायटेड या मोठ्या फुटबॉल फ्रेंचायझीकडून तो खेळतो. रोनाल्डोने पाच वेळा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला, तर चार वेळा युरोपियन गोल्डन शूज देखील जिंकले आहेत. इतकेच नाही तर त्याने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत 32 ट्रॉफी देखील जिंकल्या आहेत.

यात सात लीग जेतेपदे आहेत, तर पाच UEFA चॅम्पियन्स लीग आहेत. UEFA युरोपियन चॅम्पियनशिप व्यतिरिक्त, एक UEFA नेशन्स लीग देखील आहे. चॅम्पियन्स लीगमध्ये सर्वाधिक गोल (140) करण्याचा विक्रमही त्याच्या नावावरती आहे. याशिवाय पुरुष खेळाडूकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा विक्रमही त्याच्या नावावरती आहे. त्याने 115 आंतरराष्ट्रीय गोल देखील केले आहेत.

Cristiano Ronaldo
पणजी फुटबॉलर्सच्या पदाधिकाऱ्यांवर ठपका

युरोपसह सर्व देशांमध्ये त्यांचे लाखो चाहते आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डोवर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये निराशा पसरली होती मात्र आता रोनाल्डोची निर्दोष मुक्तता झाल्याने सर्व चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com