मुंबई इंडियन्सच्या गोटात बदलाचे संकेत, हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून डच्चू मिळणार? 'हा' खेळाडू सांभाळणार संघाची धुरा

Mumbai Indians New Captain: आयपीएल २०२६ च्या हंगामात पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची (MI) अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
Mumbai Indians New Captain
Mumbai Indians New CaptainDainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई: आयपीएल २०२६ च्या हंगामात पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची (MI) अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. आपल्याच घरच्या मैदानात म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर झालेल्या २४ व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबईचा ७ गडी राखून धुव्वा उडवला. मुंबईने विजयासाठी ठेवलेले १९६ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य पंजाबने अवघ्या १६.३ षटकांत १९८ धावा करत पूर्ण केले. या पराभवामुळे मुंबईच्या गोटात चिंतेचे वातावरण असून कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

पराभवाची मालिका आणि चाहत्यांचा संताप या मोसमात मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. ५ सामन्यांपैकी मुंबईला ४ सामन्यांत सलग पराभव पत्करावा लागला आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या एकमेव विजयानंतर दिल्ली, राजस्थान, बेंगळुरू आणि आता पंजाबने मुंबईला धूळ चारली आहे. विशेष म्हणजे, यातील दोन पराभव हे मुंबईने स्वतःच्या होम ग्राउंडवर स्वीकारले आहेत. या खराब प्रदर्शनामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला असून 'कॅप्टन बदला' अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Mumbai Indians New Captain
Goa Viral Video: 'त्या' व्हिडिओप्रकरणी युवक जेरबंद, क्राईम ब्रँचची यूपीत कारवाई; व्हिडिओ व्हायरल केल्याचा ठपका

नेतृत्व बदलाचे वारे: सूर्याच्या नावाची चर्चा हार्दिक पांड्याकडून कप्तानी काढून घेण्याबाबत आता क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मधल्या काळात हार्दिकचे काही निर्णय संघासाठी घातक ठरल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सकडे सूर्यकुमार यादवच्या रूपाने एक सक्षम पर्याय उपलब्ध आहे. सूर्याने नुकतेच टीम इंडियाला टी-२० विश्वचषक २०२६ चे जेतेपद मिळवून दिले असल्याने, व्यवस्थापन त्याच्याकडे नेतृत्व सोपवण्याचा विचार करू शकते. मात्र, स्पर्धेच्या मध्यात असा मोठा निर्णय घेतला जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Mumbai Indians New Captain
Goa IPL Betting Racket: गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त, सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा; 6 जणांना रंगेहाथ पकडलं VIDEO

हार्दिकचा कप्तानीतील चढ-उतार हार्दिक पांड्याचा आयपीएलमधील कर्णधार म्हणून रेकॉर्ड पाहिला तर तो संमिश्र आहे. गुजरात टायटन्सला पहिल्याच प्रयत्नात जेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिकला मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सावरताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्याने आतापर्यंत ६३ सामन्यांत नेतृत्व केले असून ३६ विजय आणि २७ पराभव त्याच्या खात्यात आहेत. ५८ टक्क्यांचा स्ट्राईक रेट असूनही, मुंबईच्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात तो सध्या अपयशी ठरताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com